Accident News  esakal
नाशिक

Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असून, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Latest Marathi News)

मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय वर्षे 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य कासने (वय 24) , नशिर अली अबु अन्सारी (वय 33) , जयेश बाळाराम सपाट (वय 25) अशी जखमींची नावे आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा जवळील खडवली फाट्याजवळ कंटेनर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरने कारला मागच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर या कंटेनर चालकाने कारला फरफटत नेलं. पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोलाही त्याने जोरदार धडक दिली.(Latest Marathi News)

कंटेनर चालकाने फरफटत आणलेली कार आणि कंटेनर आईस्क्रीमच्या टेम्पोला धडकले. तर आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने कारमधील प्रवासी थोजक्यात बचावले आहेत.(Latest Marathi News)

या अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर फरार झालेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी पडघा पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

Haryana Election : हरियानातील हॅट्रिकनंतर भाजपचं खास सेलिब्रेशन! राहुल गांधींना पाठवली खास भेट

Latest Maharashtra News Updates : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

Share Market Opening: शेअर बाजार हिरव्या रंगात उघडले; निफ्टी 25,000च्या वर, कच्च्या तेलात मोठी घसरण

Mumbai High Court: खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत काय केले? महामुंबईतील पालिकांना न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT