edible-oil  sakal media
नाशिक

खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; सीमा शुल्क रद्द केल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमाशुल्क रद्द केल्यामुळे तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. याचा परिणाम दर घसरणीवर झाला आहे. दोन महिन्यात २० ते २५ टक्‍क्‍यांनी दर उतरले आहेत.

रशिया- युक्रेन युद्धामुळे डिसेंबर, जानेवारीपासून खाद्यतेलाचा भडका उडाला होता. तेलाची आयात थांबल्याने दरवाढ होत होती. परंतु, आता सरकारने तेलावरील सीमाशुल्क रद्द केले आहे. सर्वसाधारण नागरिकांना आता सणासुदीच्या हंगामात तेलाचे दर घसरल्यामुळे त्याचा फायदा होईल. (Big fall in edible oil prices Effect of Abolition of Customs Duty Nashik Latest Marathi News)

देशात वर्षाला २५० टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यापैकी १४० टन तेलसाठा आयात केला जातो. बाजारपेठेत सध्या मलेशिया अर्जेंटिना इंडोनेशिया येथून तेलाची आयात होत आहे. तसेच, युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची २० ते ३० टक्के आयात सुरू झाली आहे. एकूण गरजेपैकी ६० टक्के तेल आयात करण्यात येते. तर देशातील तेल उत्पादनातून उर्वरित ४० टक्के गरज भागवली जाते.

देश आयात तेलावर अधिक अवलंबून आहे. अन्य खाद्यतेलाचे दर उतरत असले तरी शेंगदाणा तेलाचे दर मात्र चढेच आहेत. चीनमध्ये शेंगदाणा आणि त्याच्या तेलाची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र व गुजरातमधून महिन्याला दोन हजार मेट्रिक टन शेंगदाणा तेलाची निर्यात होत आहे. त्यामुळे या तेलाचे प्रतिकिलो दर १८० ते १८५ रुपये आहेत.

तेलाचा प्रकार आधी आता

सूर्यफूल १८०- १९५ १४०- १४५
सोयाबीन १५५- १५० १२०- १२५
पामतेल १३५- १४५ १००- १०५
शेंगदाणा १८०- १८५ १८०- १८५

"गेल्या सहा महिन्यांपासून तेलाचे दर वाढल्यामुळे विक्रीसुद्धा कमी झाली. आता सीमाशुल्क रद्द केल्यामुळे तेलाचे दर दररोज एक ते दोन रुपयांनी कमी होत आहे. हेच दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे." - सुदाम कोर, दुकानदार, बिजोरसे

"कोरोनाकाळात उत्पादन कमी झाले होते. आता ते वाढत आहे. त्याचप्रमाणे रशिया- युक्रेन युद्धाचाही परिणाम यावर झाला होता. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना खाद्यतेल परवडत नव्हते." - रवींद्र बधान, व्यापारी, नामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT