CM Eknath Shinde Group : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर नेते अन् कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. यात प्रामुख्याने ठाकरे गटाला दिवसेंदिवस खिंडार पडताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. माजी आमदार, जिल्हाप्रमुख यासह माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
(Big upheaval in Nashik politics Entry of office bearers from various parties into Shinde group nashik political news)
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदे गटात नेते कार्यकर्ते प्रवेश करणार असून आता मात्र हे विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कोण आहेत हे नेते अन् कार्यकर्ते आणि कुठल्या पक्षातून ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत याची माहिती जाणून घेऊया.
जिल्हाभरातून नेते अन् कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच ठाकरे गटातून माजी आमदार धनराज महाले आणि दिंडोरी तालुक्यातील 50 पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे पुतणे मंगेश करंजकर हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश भडांगे, गोरेवाडी नाशिक रोड, नाशिकरोडच्या मनसेच्या माजी नगरसेविका मेघा नितीन साळवे, सिडकोतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, शिक्षण मंडळाचे १० वर्षे सदस्य राहिलेले बाबूराव आढाव, छत्रपती सेना युवासेना अध्यक्ष गणेश कदम, विक्रम कदम आणि मनसे पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.