Nashik News : सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणून रेल्वेचा प्रवास ओळखला जातो. मात्र, लांब पल्ल्याच्या प्रवासात सजगता, तत्परता, साक्षरता आणि समयसूचकता असली, तर या प्रवासासारखे सुख कुठेच मिळत नाही.
मात्र, थोडीशी चूक आणि अशिक्षितपणा असला, तर तो खूप महागात पडू शकतो, असे आपण अनेकांकडून ऐकतो आणि याच प्रवासात चांगली माणसे भेटली, तर आपण मोठ्या संकटातून वाचू शकतो.
याचा प्रत्यय एका परप्रांतीय व अशिक्षित महिलेला आला. शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे आई व तिच्या मुलीची मोठ्या संकटातून सुटका झाली. (Bihar Shahnaz survived incident teacher punctuality saved women daughter from big crisis at igatpuri nashik news)
असा घडला प्रसंग
नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सकाळी सहाला मुंबईकडे जाणाऱ्या जनता एक्सप्रेसमधून बिहारमधील १४ वर्षाची मुलगी शेहेनाज परवीन मोहंमद अन्सारी पाणी घेण्यासाठी उतरली होती. पाणी भरेपर्यंत गाडी मुंबईकडे निघाली.
त्यामुळे मुलीने गाडीमध्ये चढण्याचा घाईघाईने प्रयत्न करू लागली. मात्र, प्रसंगावधान ठेवत इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलच्या शिक्षकांनी तिला गाडीत ओढले. शिक्षकांनी त्या मुलीला गाडीत घेतल्यानंतर डब्यांची चुकामूक झाली.
नंतर शिक्षकांनी तिची सखोल चौकशी करीत असताना, साधारण ५० वर्षीय हिंदी भाषीक परप्रांतीय प्रवासी ‘आमची मुलगी आहे’, असे भासवू लागला. मात्र, मुलीने यांना मी ओळखत नाही, असे सांगितले.
यामुळे शिक्षकांनी मुलीकडून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला असता, वडील बिहारमध्ये गावाकडे असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यासोबत फक्त आई होती. मात्र, आईकडे मोबाईल नसल्यामुळे संपर्क साधता येत नव्हता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
धावून आले देवदूत
शिक्षक हेमंत जोशी यांनी टीसींशी संपर्क केला असता, तिची आई शेहजादी फातून अन्सारी गाडीतून मुलीसाठी उडी मारत होती. मात्र, लोकांनी आईची समजूत काढल्याने ती थांबली.
त्याच लोकांनी रेल्वे पोलिसांशी चर्चा करून मुलीला आमच्यासोबत घेऊन शालीमार एक्स्प्रेसमधून आम्ही येत आहोत, असे समजले. पुन्हा श्री. जोशी यांनी टीसींशी संपर्क साधून आई व मुलीचे बोलणे करून दिले व त्या महिलेस इगतपुरीला उतरून द्या, असे सांगितले.
श्री. जोशी यांनी इगतपुरीतील कॅन्टीन मालकास फोन करून आईला त्यांच्यासोबत ठेवण्यास सांगितले. साधारण एका तासात आई व मुलीची सुखरूप भेट घडवून आणली.
या सर्व घटनेत शिक्षक कैलास निकम, हेमंत जोशी, जितेंद्र पाटील, श्री. कुमावत, विजय सोनवणे, भ. ना. चौधरी, श्री. राणे, संगीता मुसळे, पूनम पानसरे, मनीषा भोये या सर्वांची खूप मदत झाली. या सर्वांमुळे एक चांगले काम करण्याचे समाधान लाभले.
"सध्याचे युग अतिशय वेगवान आहे. वेगवान प्रवासात कुणीच कुणाचे नसते. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो, म्हणून कोणत्याही प्रवासात आपण आपली, मुलांची व परिवाराची काळजी घ्यावी. नाही तर यातूनच ‘राम तेरी गंगा’मधील मनीलाल पोसला जातो व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होते." -कैलास निकम, शिक्षक, महात्मा गांधी हायस्कूल, इगतपुरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.