bike accident latest marathi news esakal
नाशिक

Nashik : अशोकामार्गवर खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

नरेश हाळणोर

नाशिक : शहरातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची पुरती वाताहत झालेली असताना, अशोका मार्गावरील पायोनिअर हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भावेश किशोर कोठार (४०, रा. राज अपार्टमेंट, बिग बाजार समोर, नाशिक रोड), असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

दरम्यान, सदरील अपघात गेल्या जून महिन्यात झाल असता, पोलीस तपासात सदरील घटना खडड्यामुळे घडल्याचे समोर आले असून, त्यानुसार मुंबई नाका पोलिसांतर्फे मयत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bike rider killed by potholes on Ashoka Marg Nashik latest marathi news)

सदरी घटना गेल्या २२ जून २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मुंबई नाका पोलिसात पोलिस नाईक सिद्धार्थ बिरारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री भावेश कोठार हे दुचाकीवरून (एमएच- १९- एडब्ल्यू- ३४११) क्रोमा शोरूमच्या पाठीमागून अशोका मार्गाकडे जात होते.

या वेळी पायोनिअर हॉस्पिटलसमोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात भावेश यांची दुचाकी आदळली. या अपघातात ते दुचाकीसह खाली पडले असता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक पी. एन. सोनवणे हे तपास करीत आहेत. काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहरातील सुंदर रस्त्यांची पुरती वाट लागून रस्त्यांची खड्ड्यांने चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी धोकादायकरीत्या खड्डे झाले असून, वाहनचालकांना वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे.

तर पावसात वा रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता वारंवार ‘सकाळ’ मधून व्यक्त करण्यात आली. त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून मात्र दखल घेण्यात आली नाही.

महापालिकेने वेळीच दखल घेत शहरातील खड्डे तातडीने बुजविले असते तर, दुचाकीस्वाराचा जीव वाचला असता. खड्ड्यांमुळे जीव गेलेल्या भावेश कोठार यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

अपघात दोन महिन्यापूर्वीचा

सदरील अपघात गेल्या २२ जून रोजी घडला होता. याप्रकरणी मयत कोठार यांच्या कुटूंबियांकडून यासंदर्भातील पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युप्रकरणी नोंद करण्यात आली होती.

यासंदर्भात उपनिरीक्षक सोनवणे यांनी तपास करीत सदरचा अपघात खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाल्याचे समोर आले. त्यानुसार, दोन महिन्यांनी पोलिसांनी फिर्याद देत मयत दुचाकीस्वाराविरोधात स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT