नाशिक : शहर परिसरात पुन्हा दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाले असून, सहा दुचाकी चोरीला झाल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
प्रभाकर शंकर सोनवणे (रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार) यांची ॲक्सेस स्कुटी (एमएच- १५- डीवाय- २०४८) जत्रा हॉटेल- नांदूर नाका लिंक रोडवरील रामलिला लॉन्सच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता, २० ऑगस्ट चोरी झाली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bike Theft Crime Theft of 6 bikes from city Nashik Latest Marathi News)
कृष्णा सचदेव आचार्य (रा. स्नेहनगर, म्हसरुळ) यांची दुचाकी (एमएच- १५- एके- ३९२४) गेल्या १२ जुलैला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने साई संदेश रेसीडेन्सी या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल आहे. सुनील बाबूसिंग परदेशी (रा. दत्तनगर, पंचवटी) यांची दुचाकी (एमएच- १५- एफए- ६३१२) तारवालानगरमधील लामखेडे मळ्यातील त्यांच्या भाचा राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.
१२ जुलैला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय चंदर ब्राह्मणे (रा. कस्तुरबा नगर झोपडपट्टी, टिळकवाडी) यांची दुचाकी दुचाकी (एमएच- १५- एसी- ७५५७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल आहे.
गणेश धोंडिराम तांबे (रा. तिगरानिया रोड, द्वारका, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ११ ऑगस्टला मोपेड (एमएच- १५- एफजी- ९६९९) दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप हिरामण केदारे (रा. उत्तमनगर, सिडको) यांची दुचाकी (एमएच- १५- जीक्यु- २४३०) गेल्या ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी फाटा येथील हॉटेल पार्थजवळील पार्किंगमधून अज्ञात चोरट्याचे चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.