play on Chhatrapati Shivaji Maharaj in American marathi school esakal
नाशिक

Nashik : अमेरिकेत मराठी शाळांमध्ये शिवरायांचा जयघोष

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या चिंतेचा विषय असून, अनेक शाळांमध्ये मराठी विषय वैकल्पिक असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. अशा प्रतिकूल परिस्थितीत अमेरिकेतील नॅशव्हील येथे मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका पूनम सागर-शिरवळकर यांनी अनिवासी भारतीय मुलांना ऑनलाइन मराठी शाळेची सोय उपल्बध करून दिली आहे. त्यांच्या मराठी भाषा संवर्धनाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नॅशव्हील येथील शाळेत रेणुका देशमुख, आर्या महाजन, मयूरी नाईक, अपर्णा काळे, चैताली लाडे शिक्षिका आहेत. बृहन मराठी मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाचा अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. (Biography of Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi schools in America Nashik News)

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. शिवकालीन इतिहासाची आवड मुलांमध्ये बालपणीच व्हावी, यासाठी या वर्षी स्नेहसंमेलनासाठी ‘शिवगर्जना’ अशी थीम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र दाखवणारे नाटिका, पोवाडे, शिवगीते या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.

विद्यार्थ्यांनी बालशिवाजी, तरुण शिवाजी तसेच राजा शिवाजी या तीनही महाराजांच्या जीवनातील अवस्थांचा अनुभव घेतला. जवळपास ३० वेगवेगळी गीते, नाटके, नृत्य आविष्कारांनी समृद्ध असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शंभराहून अधिक कलाकारांनी भाग घेतला. नामपूर येथील युवा संशोधक, शिवचरित्राचे अभ्यासक योगेश नेर यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. शिवजन्म, महाराज नामकरण सोहळा, रायरेश्वर शपथ, शिवरायांचे प्रशिक्षण, जिजामातेच्या मार्गदर्शनाखाली घडत जाणारे शिवराय, सोन्याचा नांगर प्रसंग, शिवराज्याभिषेक हे सर्वांनी एकत्र घडवले आणि अनुभवले.

आठवड्यातून एकदा मराठी

नॅशव्हील येथील शाळेत आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना मायमराठीची ओळख करून दिली जाते. जवळपास ४० विद्यार्थी येथे शिकत आहेत. सातासमुद्रापार विद्यार्थ्यांना मराठीचे शिक्षण देणे म्हणजे मराठीचा गौरवच होय. परदेशात राहून, नवनवीन आव्हाने पेलून केवळ मराठी भाषाच नव्हे, तर मराठी संस्कृती यांचा ध्वज मनामनांत फडकवण्यासाठी शाळेची निर्मिती केली, असे पूनम सागर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. गोष्टीतून, चित्रातून, हसतखेळत या शाळेचे विद्यार्थी बालवाडी उत्तीर्ण झाले.

"परदेशात असा कार्यक्रम घेणे, हे एक दिव्यच असते. परंतु यामागे अनेक पालकांनी योगदान दिले. त्यात महाराजांचा पोशाख, तलवारी, भाले, झेंडे या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या. यातून साकार झालेला हा कार्यक्रम दिमाखदार होता. यात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून साकार झालेला हा सोहळा त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाषा शिक्षणासोबतच महाराजांचे, महाराष्ट्रातील संतांचे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. तेजस्वी मराठी भाषेची आणि ओजस्वी संस्कृती विद्यार्थ्यांच्या सहभागाने जतन करण्याची गरज आहे. यापुढेही अशा संस्कारक्षम सोहळे शाळेतर्फे घेण्याचा प्रयत्न असेल."

- पूनम शिरवळकर, मुख्याध्यापिका, नॅशव्हील मराठी शाळा, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT