भाजप शिवसेना sakal media
नाशिक

नाशिक : भाजपचे पाच, शिवसेनेचा एक नगरसेवक कुंपणावर

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुका जशा जवळ येत आहे, त्याप्रमाणे राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असून सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेवुन काही नगरसेवक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या तर शिवसेनेचा एक नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे. त्यामुळे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सोईनुसार पक्षांतर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात असून राजकीय उलथापालथीचा नारळ नाशिक रोड विभागात फुटणार आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिकसह राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी जानेवारी महिन्याच्या प्रारंभी आचारसंहिता लागेल. त्यापूर्वी प्रशासकीय तयारीचा भाग म्हणून सध्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राजकीय पातळीवर देखील निवडणुकांची तयारी सुरु झाली असून विकास कामांचे उद्‌घाटन, पक्ष मेळावे, संघटना बांधणीच्या माध्यमातून सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरू असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. राजकारणाच्या तापत असलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी विद्यमान नगरसेवकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पुन्हा महापालिकेच्या सभागृहात बसण्यासाठी कुठला पक्ष सोईचा आहे. याचा विचार करून अनेकांनी कुंपणावर सध्या उड्या टाकण्यास सुरवात केली असून त्यासाठी मुख्यत्वे शिवसेना, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठी-भेटी घेऊन शब्द पदरात पाडून घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आढावा घेतला असता नाशिक रोड विभागात राजकीय उलथापालथीची अधिक शक्यता दिसून येत असून भाजपचे पाच नगरसेवक शिवसेनेच्या तर शिवसेनेचा एक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर सोईचा भाग असल्यास आहे त्याचं पक्षातून निवडणूक लढवायची किंवा सोईचा भाग नसल्यास पक्षांतर करायचे असा कच्चा आराखडा नगरसेवकांचा असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक रोड बनणार केंद्र

शिवसेनेच्या नाशिक रोड स्थित एका ज्येष्ठ नेत्याच्या संपर्कात भाजपचा एक ज्येष्ठ नगरसेवक आला आहे. त्यापूर्वी भाजपच्या मुख्य धारेपासून कायम दूर राहिलेल्या एका नगरसेवकाला शिवसेना पक्ष जवळचा वाटू लागला आहे. अन्य एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपचे नेते संपर्कात असल्याने भाजपच्या विद्यमान नगरसेवकाने शिवसेनेशी संपर्क साधला आहे. राज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न उद्‌याला आल्यानंतर एका नगरसेविकेने यापूर्वीच पक्षाच्या ध्येय, धोरणांना तिलांजली दिली आहे. नाशिकरोड शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने त्यातही ग्रामिण भागात शिवसेनेचे हक्काचे मतदान असल्याने भाजपचा एक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आला आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला जोडीदार नगरसेवक निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपच्या पॅनलमध्ये जागा मिळविण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर नाशिक रोड राजकीय उलथापालथीचे केंद्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT