नाशिक : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे जवळपास ३०० कोटीहून अधिक रक्कम आढळून आल्याने भाजप आक्रमक झाला असून, सोमवारी (ता. ११) शहरात विविध ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून निषेध केला. (BJP aggressive against MP Sahu Protests at various places in city nashik political)
पंचवटी तपोवन मंडल व पंचवटी भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस खासदार साहूंच्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काँग्रेस खासदारांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनप्रसंगी भाजप तपोवन मंडल महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता मुठे, माजी महिला अध्यक्ष मंजूषा लोहगावकर, तपोवन मंडल चिटणीस उज्ज्वला बेलसरे, रोहिणी दळवी, अंजली अभंगराव, आरती बेलसरे, मनिषा बागूल, रेखा गिते, अनिता सोनवणे, शहर सरचिटणीस सुनील केदार, पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, शहर सचिव अमित घुगे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ बोडके, तपोवन मंडल युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश पिंपरकर, तपोवन मंडल सरचिटणीस दिगंबर धुमाळ, महेश महंकाळे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष नीलेश पवार, ह्रषीकेश आहेर, प्रसिद्धीप्रमुख भाजप महानगर राहुल कुलकर्णी, प्रशांत वाघ, विजय बनछोडे, महेश महंकाळे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.