नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संघटनात्मक पातळीवर बदल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची ९ एप्रिलला पक्ष कार्यालयात बैठक घेणार आहे. बैठकीत नाव निश्चिती होऊन १५ एप्रिलपर्यंत शहराध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (BJP city president will be announced by April 15 nashik news)
बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेत नवीन शहराध्यक्षांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील बदल करण्याचे संकेत आहे.
त्याअनुषंगाने भाजपच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीत बदल केले जाणार आहे. बदल करताना नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे. आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर होते.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
परंतु, पक्ष पातळीवरून आमदार व खासदारांना शहराध्यक्ष किंवा संघटनेचे महत्त्वाचे पदे न देण्याचे धोरण आखल्याने ढिकले यांचे नाव मागे पडले. ज्येष्ठ नेते म्हणून विजय साने, लक्ष्मण सावजी व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे नावदेखील चर्चेत होते.
ही नावे आहेत चर्चेत
भाजप शहराध्यक्ष पदासाठी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, हेमंत धात्रक, माजी गटनेते जगदीश पाटील, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, माजी नगरसेवक अजिंक्य साने, सुनील केदार, नाना शिलेदार यांची नावे चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.