bjp conducting survey and testing candidates for dindori lok sabha election nashik news esakal
नाशिक

Nashik Loksabha Election : दिंडोरीत लोकसभेसाठी भाजपकडून चाचपणी; इच्छुकांची संख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik Loksabha Election : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, मतदारसंघनिहाय सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही पक्षाकडून सर्व्हे सुरू असून, उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. (bjp conducting survey and testing candidates for dindori lok sabha election nashik news)

यात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सावरपाडा एक्स्प्रेस असलेल्या कविता राऊत, नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी, माजी खासदार (कै.) कचरूभाऊ राऊत यांचे पुत्र विजय राऊत, आदिवासी विकास आघाडीचे प्रदेश पदाधिकारी एन. डी. गावित, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता चारोसकर यांच्या नावांची चर्चा आहे. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघापाठोपाठ दिंडोरी लोकसभा मतदरासंघातही भाजप अंतर्गत इच्छुकांची संख्या वाढली आहे.

निवडणूक सर्वेक्षणावर भाजपचा मोठा विश्वास आहे. मध्यंतरी पक्षीय पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अशा अशा सर्वेक्षणाचा इन्कार केला असला, तरी नंतरचा अजित पवार यांचा सरकारमधील प्रवेश हा त्या सर्वेक्षणाचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

गत अडीच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणांत मोठा बदल झाल्याने त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र, शिवसेनेंतर्गत फूट पडून शिंदे गट बाहेर पडला. यामुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे गटामुळे भाजप राज्यात सत्तेत आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन गटांत विखुरलेल्या शिवसेनेचे पडसाद मतदारसंघात दिसत असतानाच, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह आमदारांच्या गटाने भाजपशी युती करीत थेट सत्तेत सहभाग घेतला. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने याचे पडसाद या मतदारसंघावर पडणार आहेत. यादृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाले असल्याचे बोलले जाते.

कविता राऊत, भानसींचीही चर्चा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु, पक्षाकडून अन्य उमेदवारांची चाचपणी या माध्यमातून सुरू केली असल्याचे सांगितले जाते. यात कविता राऊत यांचे नाव पुढे आले आहे. प्रदेश भाजपकडून राऊत यांची भेटही झाल्याचे सांगितले जाते.

राऊत यांचे सासर बाडगीपाडा येथे आहे. माजी खासदार (कै.) कचरूभाऊ राऊत यांच्या कन्या तथा नाशिकच्या माजी महापौर राहिलेल्या रंजना भानसी व पुत्र विजय राऊत यांच्या नावांसाठी शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला असल्याने त्यांची नावेही चर्चेत आली आहेत.

एन. डी., सुनीता चारोसकर

गत लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजाविणारे आदिवासी विकास मोर्चाचे महामंत्री एन. डी. गावित यांच्या नावासाठी पक्षातील श्रेष्ठींनी प्रयत्न सुरू केल्याने त्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे.

गत निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारीसाठी आग्रह झालेले दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या पत्नी माजी सभापती सुनीता चारोसकर यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. निवडणुकीस अद्याप कालावधी असला, तरी मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT