BJP esakal
नाशिक

Nashik BJP : अमर्यादित सत्तेमुळे भाजपाचा अहंकार वाढीस

गल्लीपासून दिल्लीपर्यंत मिळतं असलेल्या विजयामुळे भाजपच्या सत्तेचा वारू सध्या चौफेर उधळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP : गल्लीपासून दिल्लीपर्यंत मिळतं असलेल्या विजयामुळे भाजपच्या सत्तेचा वारू सध्या चौफेर उधळला आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी काही प्रमाणात अहंकार वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पक्षाच्या ध्येयधोरणांमुळे नव्हेतर मिळतं असलेला विजय आपल्याच मुळेच आहे.

असा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. वर्षभरात ‘ग’ ची बाधा झालेले अनेक जण संघटनेत निर्माण झाले. मी सांगेल तीच पूर्व दिशा असा ठोसा लावल्याने त्यातून संघटनेत घराणेशाही निर्माण झाली. त्यामुळे काँग्रेसला शिव्या देणारे भाजप त्याचं वाटेवरून चालताना दिसले.- विक्रांत मते (BJP ego will increase due to unlimited power nashik bjp news)

सत्तेच्या अंगाने विचार करता सध्या भाजपचे खरोखर अच्छे दिन सुरू आहे. हे दिवस एकाएकी आलेले नाही. यामागे त्याग, कष्टाची भावना आहे. परंतु त्याग, कष्टातून आज सत्तेची फळे चाखत आहोत. हे संघटनेत खालच्या स्तरावर काम करणाऱ्यांना माहीत नसावे. त्यामुळेच अहंकार वर येताना दिसतं आहे.

त्याचा परिणाम वरकरणी पक्ष संघटना बळकट दिसतं असली तरी अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागल्याचे वर्षभरात दिसून आले. महाविकास आघाडीची सत्ता होती. त्या वेळी सरकार विरोधात भूमिका घेतली गेली. निसर्ग नियमानुसार ती घेणे क्रमप्राप्तच होते. परंतु स्वतःचे म्हणजे महायुतीची सत्ता आल्यानंतर आंदोलने कमी होतील, असे वाटतं होते. परंतु उलट भाजपकडून आंदोलने वाढली.

परंतु ती आंदोलने त्या वेळी सत्तेविरोधात होती. आता ती विरोधकांची पराभूत वृत्ती अधिक वाढविण्यासाठी दिसली. विरोधकांना तोंड वर काढू न देण्याची भाजपची चाल यशस्वी ठरली. भाजपच्या माऱ्यापुढे विरोधक नामोहरण झाल्याचे दिसले. सत्ता असूनही वर्षभरात भाजपचे जवळपास २४ हून अधिक आंदोलने झाली.

वास्तविक विरोधकांकडून अशी आंदोलने अपेक्षित असताना भाजपने सत्ता असूनही आंदोलने केली. निवडणुका नसल्याने पक्षात मरगळ आल्याचे दिसून आले नाही. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पक्षातील जिवंतपणा दिसून आला. आंदोलने, मेळावे नाही झाले तरी संघटनेच्या प्रमुखांचे व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद, पत्रकार परिषदा असे उपक्रम राबवून पक्षाने नेते, कार्यकर्त्यांमधील संवाद कायम ठेवला.

पक्षाच्या वर्षभराच्या एकंदरीत कार्यकाळात संघटनात्मक पातळीवरच्या नियुक्त्या महत्त्वाच्या ठरल्या. संघटनेतील बदल भाजपचे काँग्रेस होत असल्याकडे अंगुलिनिर्देश करते. संघटनेच्या कार्यकारिणीत घराणेशाही दिसून आली. महत्त्वाची पदे दिली, त्या पदांवरील व्यक्ती ‘जी हुजूर’ वर्गातील राहील याची काळजी घेतल्याचे दिसून आले.

निवडणुका नसल्याने इतर पक्षाप्रमाणेचं मरगळ दिसली परंतु रेसकोर्समधील पळणार घोडा असल्याने अनेकांनी ते जाणवू दिले नाही. कृत्रिम चेहऱ्याने का होईना गर्दी वाढविण्यासाठी हजर राहील. भाजपचे शहरात जे काही आंदोलने झाली. त्या आंदोलनात तेच-तेच चेहरे दिसून आल्याने पक्षाकडून आलेला कार्यक्रम पार पाडणे एवढेच ध्येय गाठल्याचे दिसून आले. सोशल मीडिया भाजपची ताकद आहे. ती ताकद नेते, कार्यकर्त्यांनी कायम ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT