नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेनेदेखील विधानसभेच्या या जागेवर दावा करण्याची तयारी सुरू केली आहे.
पूर्व मतदारसंघामध्ये तयारीचा भाग म्हणून सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नेत्याला मातोश्रीचे दर्शन घडवून आणल्याचेही चर्चेने नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (BJP leaders Matoshree visit in discussion Shiv Sena preparing to fight in East Constituency Nashik Political News)
पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
लोकसभा व त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका होणार असल्याने पाच वर्षातील राज्यातील राजकारणाचा विचार करून नकारात्मक मतदान पडू नये म्हणून लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीचीदेखील तयारी इच्छुकांकडून सुरू झाली आहे. २०१९ पूर्वी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ होता.
परंतु आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन होऊन नवीन गट स्थापन झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटानेदेखील पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून भाजपशी दोन हात करण्यासाठी याच पक्षातील एका नेत्याला मातोश्री दर्शन घडवून आणल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या नेत्यांच्या पक्ष बदलाच्या शक्यतेने भाजपनेदेखील दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. तर नाशिक रोडच्या शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्याने ‘मातोश्रीवारी’ घडवून आणली तोदेखील चर्चेत आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.