Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Secretary Bhausaheb Chaudhary while congratulating Balasaheb after appointing Raju Lovete as Shiv Sena Co-liaison Leader and Ajay Boraste as District Chief. esakal
नाशिक

Nashik Political News : आगामी निवडणुकीत भाजप- सेना युतीचा भगवा; मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सहसंपर्क नेतेपदी राजू लवटे, तर जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते यांची नियुक्ती बुधवारी (ता. ११) करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी आगामी निवडणुकीत महापालिकेवर भाजप व शिवसेना युतीचा भगवा फडकेल, असा शब्द दोघांनी दिला. (BJP shiv Sena alliance in upcoming elections word given to CM shinde Nashik Political News)

जून महिन्यात महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या व्यतिरिक्त दमदार असा नेता बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळत नव्हता.

डिसेंबर महिन्यात मात्र जवळपास १३ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर संघटना बळकट होण्यास मदत झाली. त्याअनुषंगाने आता संघटना अधिक बळकट करण्यासाठी पदांचे वाटप होणे गरजेचे होते.

त्यानुसार नाशिक जिल्हा सहसंपर्क नेतेपदी राजू लवटे, तर जिल्हाप्रमुखपदी बोरस्ते यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी दोघांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

दोघेही अनुभवी

राजू लवटे यांच्याकडे सत्तेची पदे नसली तरी त्यांचे बंधू सूर्यकांत लवटे मागील तीन टर्म महापालिकेचे नगरसेवक आहे. राजू लवटे यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली.

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, महापालिकेचे गटनेते, शिवसेनेचे महानगरप्रमुख या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अजय बोरस्ते यांनी पार पाडल्या आहेत. २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीची शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी बोरस्ते यांच्याकडे होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

"येत्या काळात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा संपूर्ण नाशिक शहर व जिल्ह्यात फडकविण्याची जबाबदारी विश्वासाने पार पाडू."

- राजू लवटे, सहसंपर्क नेते, बाळासाहेबांची शिवसेना

"आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपच्या युतीचा झेंडा दोन्ही संस्थांवर फडकवू."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT