rajabhau vaje & Makirao Kokate esakal
नाशिक

Market Committee Election: सिन्नरला BJP निवडणूक रिंगणात उतरणार; वाजे-कोकाटे गटांविरोधात तिसऱ्या पॅनलची शक्यता!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सक्षम पॅनल निर्मिती करून आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांना आव्हान उभे करण्याचा संकल्प तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याने ही निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. (BJP will enter Market Committee Election at sinnar possibility of third panel against Waje kokate group nashik news)

बाजार समितीच्या निवडणुकीत कोकाटे आणि वाजे - उदय सांगळे यांच्या गटात दुरंगी लढत होऊ घातलेली असतानाच भाजपकडून देखील स्वतंत्रपणे पॅनल उभे करून निवडणूक तिरंगी होण्यासाठी व्यूहरचना करण्यात आली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील काही विविध कार्य सेवा संस्थेचे संचालक, ग्रामपंचायतचे सदस्य व व्यापारी गटातील मतदारांची भाजपच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली.

या बैठकीमध्ये समविचारी संचालक, ग्रामपंचायत सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक असल्यामुळे समविचारी राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्रित करून एक सक्षम पॅनल निवडणुकीमध्ये उतरवण्याचा निर्धार करण्यात आला.

सर्व राजकीय पक्षातील चांगल्या विचाराच्या लोकांना एकत्र करून पॅनल निर्मिती करण्याचे ठरविण्यात आले. पॅनल तयार करताना चांगल्या विचाराच्या लोकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाजपच्या माध्यमातून कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व जागांसाठी उमेदवार मिळून पॅनल तयार झाल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. बाजार समितीची झालेली दुरवस्था बघता चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन चांगले उमेदवार द्यावेत व तालुक्यातील सर्व भागांना व सर्व समाजांना उमेदवारी देताना प्राधान्य देण्यात यावे असे बैठकीत ठरले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे, तालुका उपाध्यक्ष रामदास भोर, ज्ञानेश्वर कुन्हाडे, रामनाथ डावरे, प्रमोद उगले, राजेश घुगे, सविता कोकर, सुरेखा रेवगडे, भाऊसाहेब तांबे, अनिल शेलार, ज्ञानेश्वर आव्हाड, वाळीबा आव्हाड, संदीप आढाव, उषा कराड, सुनील माळी, शिवाजी वेलजाळी यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

अहवाल वरिष्ठांना सादर

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये जाऊन गट व गणनिहाय बैठका घेतल्या. संभाव्य उमेदवारांची चाचपणीही केली आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला असून पक्ष पातळीवर विद्यमान प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यात येईल असे जयंत आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT