Nashik Political : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वसंत गिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या शक्तिप्रदर्शनाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी झाडून हजेरी लावली.
भाजप नेत्यांनी लावलेली हजेरी मैत्रीचे ऋणानुबंध जपण्यासाठी की राजकीय डावपेचासाठी यावरून चर्चा रंगली आहे. (BJPs support for vasant Gite show of power Attendance of senior leaders of BJP on birthday Nashik Political)
पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होत आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळेल किंवा नाही हा भाग अलहिदा असला तरी या वर्षी नेत्यांचे होणारे वाढदिवस शक्तिप्रदर्शनाने गाजत आहे.
पंचवटी विभागामध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्ते आपल्या मागे आहे की नाही याची चाचणी केली. सानप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंचवटी विभागात बॅनरबाजी झाली.
त्यापाठोपाठ आमदार ॲड. राहुल ढिकले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. सानप यांच्यापेक्षा ढिकले यांचे शक्तीप्रदर्शन उजवे ठरले. संपूर्ण शहरभर ढिकले यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले.
कार्यकर्त्यांचा लवाजमा ढिकले यांच्याकडे अधिक दिसून आला. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ढिकले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा प्रवास करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांनीदेखील वाजतगाजत वाढदिवस साजरा केला.
असाच एक वाढदिवस शहरात चर्चेला आला. एकेकाळी शहराच्या राजकारणात सर्वेसर्वा असलेल्या माजी आमदार वसंत गिते यांचा वाढदिवस नुकताच मुंबई नाका येथे साजरा करण्यात आला. गितेंच्या वाढदिवसालादेखील मोठी गर्दी झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जुन्या व नव्या मित्रांनी गिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीच अधिक गर्दी दिसून आली. त्यामुळे गिते यांचा वाढदिवस राजकीय अंगाने चर्चेला आला.
मित्रत्वाचे ऋणानुबंध की...
वसंत गिते हे भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांनी तीन वर्षापूर्वी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे गिते यांच्याकडे असलेले कार्यकर्त्यांचे पाठबळ कारणीभूत होते. परंतु शिवसैनिक असल्याने गिते यांना भाजपचा स्वभाव पचनी पडला नाही.
त्यामुळे पुन्हा त्यांनी शिवबंधन हाती बांधले. गिते हे कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचे मित्रत्वाचे संबंध सर्वच पक्षाच्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी आहे. गिते दरवर्षी वाढदिवस साजरा करतात, मात्र या वर्षी त्यांचा वाढदिवस भाजप नेत्यांनीच गाजविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.