NMC Promotion Black Market : महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षण अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले असताना दुसरीकडे प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात पदोन्नत्यांचा काळाबाजार समोर आला आहे.
यातून करोडो रुपयांचे मालमत्ता कमविली जात असून, पात्र नसलेल्यांनाही पदोन्नती दिली जात आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी तांत्रिक संवर्गातील ज्या अभियंत्यांना अपात्र ठरवले होते, त्यांनाच आता मोठ्या पदांवर पदोन्नती देऊन जाता, जाता हात मारण्याचा प्रकार होत आहे.
प्रशासनाकडून गेल्या चार वर्षात झालेल्या पदोन्नती व बदल्यांची चौकशी लाचलुचपत विभागाने करावी, अशी मागणी आता होत आहे. (Black market for promotions in NMC Promotion to post of Engineer despite not being qualified nashik news)
नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. या भ्रष्टाचारामुळे नाशिक शहराची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असून, बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून होणारी लूट थांबवावी अशी जोरदार मागणी होत आहे.
शिक्षण विभागातील भ्रष्टाचार लाचलुचपत विभागाने शिक्षण अधिकाऱ्याला रंगेहात पकडून समोर आणला आहे. आता प्रशासनाकडून होत असलेला भ्रष्टाचारावर थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे.
जम्पिंग प्रमोशनचा झोल
महापालिकेमध्ये मागील वर्षीच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात तांत्रिक संवर्गातील अनेकांना अपात्र ठरविण्यात आले.
परंतु नुकतेच बदलीचे आदेश प्राप्त झालेले प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्याकडून गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अपात्र ठरविलेल्या तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात असल्याने अपात्र ठरविण्यात आलेले अभियंते आता कसे पात्र ठरतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे मात्र पात्र अभियंते पदोन्नतीपासून मुकण्याची शक्यता आहे. पदोन्नती देताना गुणवत्ता यादीत मागे असलेल्यांना जम्पिंग प्रमोशन दिले जात आहे.
पात्र कर्मचारी उपलब्ध असतानादेखील नियमबाह्य पदोन्नती दिली जात असल्याने याविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कार्यकारी अभियंत्यांची पदोन्नती वादात
कनिष्ठ अभियंत्यांना वरिष्ठ अभियंते व वरिष्ठ अभियंता उपअभियंता व पुढे कार्यकारी अभियंता पदावर नुकत्याच देण्यात आलेल्या पदोन्नत्या वादात सापडणार आहे नियमबाह्य या पदोन्नत्या असून पात्र अधिकारी असताना कार्यकारी अभियंता पदावर दिलेल्या पदोन्नत्या वादात सापडणार आहे.
घोडे पाटलांची वादग्रस्त कारकीर्द
प्रशासन उपयुाक्तपदावर असलेले घोडे पाटील यांची ३१ मेस बदली झाली, मात्र त्यानंतरही अजूनपर्यंत त्यांचे महापालिका मुख्यालयात काम सुरू आहे. या कालावधीमध्ये पदोन्नत्यांचे इतिवृत्त मंजूर करण्याबरोबरच पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे उद्योग मुख्यालयात सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ज्या दिवशी शासनाचे आदेश आले, त्याच दिवशी घोडे पाटील यांनी पदभार सोडणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता अद्यापही त्यांचे काम सुरू आहे. उपायुक्त पदावर दोन वर्ष काम करता येते, मात्र घोडे पाटील यांनी मंत्रालयात फिल्डिंग लावून आणखीन दोन वर्षे वाढवून घेतले.
अशाप्रकारे चार ते साडेचार वर्षांपासून प्रशासन उपायुक्त पदावर कार्यरत आहे. त्यांच्या जागी नियुक्त झालेले लक्ष्मीकांत साताळकर हेदेखील अद्याप रुजू का होत नाही, याचे देखील कर्मचाऱ्यांना मोठे कोडे पडले आहे.
आयटीआय होल्डर झाले अभियंते
नाशिक महापालिकेमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या व नुकतीच पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांची पदवी तपासावी, अशी मागणी आता जोरकसपणे पुढे येत आहे.
त्याला कारण म्हणजे आयटीआय कोर्स केलेल्या मिस्त्री व तत्सम पदांवरील कर्मचाऱ्यांनादेखील कनिष्ठ अभियंता म्हणून प्रशासन विभागाने पदे दिल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.