Angry women protesting on Malegaon Road to draw attention to the lack of water supply in Dattanagar area of ​​Nandgaon. esakal
नाशिक

Nashik News: नांदगावला पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको! 22 दिवसांपासून दत्तनगरचा पाणीपुरवठा ठप्प

दत्तनगर भागात वीस बावीस दिवसापासून पाणी मिळाले नसल्याच्या मुद्द्यावरून नागरिक आणि महिलांनी सोमवारी (ता.२९) मालेगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : येथील दत्तनगर भागात वीस बावीस दिवसापासून पाणी मिळाले नसल्याच्या मुद्द्यावरून नागरिक आणि महिलांनी सोमवारी (ता.२९) मालेगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. (Block path of women to Nandgaon for water Water supply to Dattanagar stopped for 22 days Nashik News)

नांदगाव शहरातील दत्तनगर भागात मागील २२ दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प झाला आहे.

शहरातील इतर भागात पाणी सोडले जात असताना दत्तनगरलाच का टाळले जात आहे ? असा प्रश्‍न येथील संतप्त महिला व नागरिकांनी करीत सोमवारी (ता.२९) सकाळी मालेगाव रस्त्यावर सुनील दुगड, प्रवीण गुप्ता यांच्यासह परिसरातील महिलांनी डोक्यावर हंडे घेत रास्ता रोको आंदोलन केले.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे मालेगाव रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त महिलांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

यानंतर पालिका प्रशासनसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी बंडू कायस्थ यांनी सायंकाळी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर संतप्त महिलांनी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे तब्बल २२ दिवसानंतर दत्तनगर भागात पाण्याचा पुरवठा झाला.

"पालिकेच्या दहेगाव धरणातील जलाशय कोरडे पडल्याने माणिकपुंज धरणातून पाणी उचलावे लागते. गिरणा योजनेच्या आवर्तनाचा कालावधी नियमित राहिल्यास पाणी वितरणात सुसूत्रता येवून आवर्तनाचा कालावधी आठ दिवसावर येऊ शकतो. मात्र वीजपुरवठा, तांत्रिक दृष्ट्या जलवाहिनीवर पडणारा दाब, या सर्व प्रकारामुळे वितरण व्यवस्थेवर ताड पडत आहे."

- विवेक धांडे, मुख्याधिकारी, नांदगाव पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT