वडेल : येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाराला पगारदार, शिक्षकासह सर्वसामान्य ग्राहक वैतागले आहेत.
अजंग, वडेल, टिपे, डाबली आदी परिसरातील ग्राहकांचा येथे संपर्क येतो. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उद्धटपणे दिली जातात.
अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहेत. त्याची संबंधितांनी दखल घ्यावी व कर्मचाऱ्यांना समजत देत वागणुकीत सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Blockage of customers in Bank of Maharashtra Citizens were outraged by complaint at Vadel Nashik News)
सातत्याने खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो, तो वेगळा. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बँकेची सेवा सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वडेलच्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतील कर्मचाऱ्यांकडून लहानसहान कामासाठी शाखेतील कर्मचारी विलंब करतात. याबाबत ग्राहकांनी विचारणा केल्यास उद्धटपणे वागणूक दिली जाते. ग्राहकांनी विचारणा केल्यास सर्व्हर डाऊन आहे, कनेक्टिविटी नसल्याचे कारण दिले जाते.
जाब विचारल्यावर कर्मचारी जाणूनबुजून विलंब करून ग्राहकांना रखडवतात. या प्रकारामुळे वडेल, टिपे, डाबली आदी परिसरातील अनेक ग्राहकांनी खाते बंद करण्याबाबत बॅंकेला विचारणा केली आहे.
येथील शाखेत निरक्षर नागरिकांची खाती मोठ्या प्रमाणावर आहेत. लहानसहान कामांना व निरक्षर ग्राहकांना शाखेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करे अपेक्षित असताना जाणूनबुजून त्यांना त्रास दिला जातो, अरेरावी केली जाते हे योग्य नसल्याचे सुनील शेलार यांनी सांगितले. आगामी काळात कामकाजात सुधारणा न झाल्यास ग्राहक वेगळी भूमिका घेतील असेही ते म्हणाले.
"ग्राहकांबी कोणत्याही कामात दिरंगाई होत असेल, अथवा काही अडचणी असतील, कर्मचारी अरेरावी करत असतील तर त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाईल."- साईल अग्रवाल, व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, वडेल शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.