Nashik News : ब्लू बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. रॅलीच्या पहिल्या २२ किलोमीटरच्या चरणात बोंबीलटेक ते अंबोली या मार्गावरील मेटकावळे भागात सुरवातीपासून वेगाचा थरार नागरिकांना अनुभवता आला. शनिवारी (ता. ३१) रॅलीच्या तिसऱ्या चरणात निळमाथी ते ओसिवरा घानवळ, धांदवळ हा जास्त घाट व खडक धुळ मातींच्या रस्त्यांवर वेगाने धुराळा उडवत येणारी वाहने आणि घाटात जागेवरच वळण घेताना वेगावर नियंत्रण करताना चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. (Blue Band Sports INRC 2024 Rally of Maharashtra start in nashik )
नामांकित कारचालक गौरव गिल,अर्जुन अरोर राव,मथाई फिलोपस आणि जहान गिल यांचे वेगवेगळ्या चरणात नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या बाहेर गेल्याने त्यांना रॅली पूर्ण करण्यात अपय़श आले, याशिवाय वेगवेगळ्या गटात आज १४ कारचालक विविध तांत्रिक बाबींमुळे रॅलीचे चरण पूर्ण करू शकले नाही. रॅलीच्या सुरवातीला कर्णा कदूर, अमित्रजित घोष हे कारचालक गेल्यानंतर वेगात आलेला गौरव गिलचे नियंत्रण सुटल्याने तो एका वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या खाली गेला.
त्यानंतर त्यांच्याच पाठोपाठ आलेला फिलोपस याचे देखील नियंत्रण सुटल्याने तो खाली गेला. याशिवाय वेगवेगळ्या गटात आज १४ कारचालक विविध तांत्रिक बाबींमुळे रॅलीचे चरण पूर्ण करू शकले नाही. हे सर्वजण अंतिम चरणात रविवारी (ता.२) उतरणार आहे. बोबींलटेक मेटकावळे, घानवळ, कासोली, अडगाव या परिसरातील अनुक्रमे सहा आणि दहा किलोमीटरच्या चरणांमध्ये विविध गटातील जहान गील, अर्जुन अरोर राव, वेणूनाथ व्ही, प्रदीप रवी आदी १४ जणांना आपल्या कारमधील तांत्रिक समस्येमुळे चरण पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले.
आपल्या गाडीतील ही तांत्रिक दुरुस्ती करून उद्या हे सर्वजण सहभागी होणार आहे. पोशेरा ते मोरचुंडी, कसोली, हिरवेपाडा, मेटकावळे या साडेनऊ किलोमिटरच्या या चरणात स्पर्धेकांमध्ये चुरस दिसली, पोशेरा, कसोली, हिरवेपाडा, मोरचुंडी या घटरस्त्याच्या वळणदार भागातून कार चालवितांना स्पर्धेकांनी आपले कसब दाखवले. उंचच उंच डोगरावर उभे असणाऱ्या गावकरी चालकांचे टाळ्या, शिट्या वाजवून स्वागत करत होते. (latest marathi news)
निकाल : प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे (कंसात वेळ)
ओव्हरऑल गट :
- फाबिद अहमर-१तास ७ मि.५ सेकंद
-हरकिशन वाडीया-१तास८ मि.८ सेकंद
-कर्ण कदूर-१ तास ९ मिनिटे २० सेकंद
आयएनआरसी टू गट
-फाबिद अहमर-१तास ७ मि.५ सेकंद
-हरकिशन वाडीया-१तास८ मि.८ सेकंद
-रामचरण सी-१ तास १५ मि.९ सेकंद
आयएनआरसी थ्री गट
-अजय संकर-१ तास १० मि.
-जित जबाख-१ तास १० मि.९ सेकंद
-अर्जुन राजीव-१ तास १० मि.१३ सेकंद
जिप्सी चॅलेज गट :
-बलजिंदरसिंग धिल्लो-१ तास १५मि.४४ सेकंद
-डॉ.आकर्ष सुंदर-१तास १५ मि.४८ सेकंद
-संजय अग्रवाल- १ तास १६ मि.११ सेकंद
क्लासिक गट (एकमेव कारचालक) :
-शेख हुसेन पाशा-१ तास ३३ मिनिटे ६ सेकंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.