Bodhi Tree at Buddha Memorial esakal
नाशिक

Nashik News : बोधी वृक्षाने धार्मिक पर्यटनाला बळ, फाळके स्मारकाचा पुनर्विकास रखडला

पर्यटनाच्या दृष्टीने फाळके स्मारक आणि बॉटनिकल गार्डनची नव्याने उभारणी होत नाशिकच्या वैभवात भर पडेल, ही अपेक्षा सरत्या वर्षातदेखील फोल ठरली.

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पर्यटनाच्या दृष्टीने फाळके स्मारक आणि बॉटनिकल गार्डनची नव्याने उभारणी होत नाशिकच्या वैभवात भर पडेल, ही अपेक्षा सरत्या वर्षातदेखील फोल ठरली. एकेकाळी लाखांचे उत्पन्न देणाऱ्या फाळके स्मारकाची अवस्था बघणे नाशिककरांसाठी मोठे वेदनादायी आहे. हीच गत बॉटनिकल गार्डनची झाली आहे.

मोठ्या दिमाखात टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने आकर्षक असे उद्यान साकारले गेले. लेझर शो आणि इतर बाबींनी पर्यटकांना भुरळ घातली. मात्र लेझर शोमध्ये तांत्रिक अडचणी सुरू झाल्या. त्याचे तंत्रज्ञदेखील मिळणे मुश्कील झाले आणि हा चांगला प्रकल्प आज लयास जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.- राजेंद्र बच्छाव (Bodhi tree boost religious tourism stall redevelopment of Phalke memorial nashik recap 2023 news)

फाळके स्मारकाबद्दल अनेक बैठका झाल्या. दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांच्यापासून रामोजी फिल्मसिटी धर्तीवर विकास केला जाईल, अशा चर्चा झाल्या. सत्ताधारी, विरोधकांनी पाहणी दौरे केले. मात्र स्मारकाचा विकास काही झाला नाही. स्मारक प्रेमीयुगलांचा अड्डा झालाय की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

नाही म्हणायला येथील बुद्ध स्मारकात २४ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रीलंकेत असलेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण झाले. हा वृक्ष आता चांगलाच फुलला असून, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. पांडव लेणी भागातदेखील पुरातत्त्व विभागाकडून अनेक नावीन्यपूर्ण बाबींची घोषणा झाली होती.

मात्र, त्याही घोषणाच राहिल्या. लेणी परिसरात सुटीला मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटनासोबत लेण्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतलेली दिसून येत नाही. हा पुरातन ठेवा जपण्यासाठी येत्या वर्षात तरी ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा आहे.

राजकीय पटलावर भाजपच्या शहर कार्यकारिणीत इंदिरानगर भागातून माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, माजी नगरसेवक सुनील खोडे, ॲड. श्याम बडोदे, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी, माजी नगरसेवक ॲड. अजिंक्य साने, सुनील फरांदे आदींना संघटनेत पद मिळाले. मात्र घराणेशाहीचा पगडा कायम राहीला.

त्यामुळे या ‘पार्टी विथ डिफरन्स’ मध्येदेखील जे सत्ताधारी आहेत त्यांनाच संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्ते राहतील की काय, असा प्रश्न स्वपक्षांनीच दबक्या आवाजात विचारण्यास सुरवात केली आहे. पाथर्डी भागात शिवसेनेला खिंडार पडून शिंदे गट ताकदवान झाला. त्यामुळे ठाकरे गटाचे आता काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र पोकळी तत्काळ भरून काढण्यात यश मिळाल्याने जोमाने पक्षबांधणी सुरू झाली आहे.

अशीच परिस्थिती राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थिती झाली. डीजीपीनगर, इंदिरानगर, राजीवनगर या भागात रस्त्यांचे पुन्हा पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. मात्र दुसरीकडे वासननगर, पाथर्डी फाटा भागातील अनेक कॉलनीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून डांबराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रस्त्यांना यंदादेखील डांबरी करणाचा मुहूर्त लागला नाही. इंदिरानगरसह वडाळा, पांडवनगरी, वासननगर, पाथर्डी फाटा आदी भागात कमी दाबाने होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कोणताही उपाय प्रशासनाला सापडला नाही.

या प्रश्नावर महिलांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. इंदिरानगर भागात अनेक वर्षांपासून छोटेखानी नाट्यगृह आणि अद्ययावत तरण तलावाचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र त्याला मुहूर्त लागला नाही. तलावाचे स्वप्न मात्र नवीन वर्षाच्या सुरवातीलाच शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचे आश्‍वासन पदरात पडले आहे.

सदिच्छानगर येथील महापालिकेच्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकाकडून होणारे अतिक्रमण परतावून लावत हजारो चौरस फूट क्रीडांगणाची जागा वाचली. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या एमडी ड्रग्ज रॅकेटमुळे चर्चेत आलेले वडाळा यंदादेखील गुन्हेगारी कनेक्शनमुळे कुप्रसिद्धच राहिले. येथील छोटी भाभीला अटक केल्यानंतर त्या माध्यमातून अनेक मोठ्या राजकीय नेत्यांवर संशयाची सुई नेत आरोप होत आहेत.

साईनाथ चौफुली मार्गे वडाळा गावालगत डीजीपीनगरकडे जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या दुरवस्थेकडे नागरिकांनी लक्ष वेधले, मात्र तात्पुरती डागडुजी वगळता कोणत्याही उपाययोजना झाली नाही. वडाळा गावात असलेले गोठ्यांचे, वसाहतींमधील गुन्हेगारीचे त्यासोबतच गावात असलेल्या उर्दू माध्यमाच्या शाळांच्या तक्रारीबाबत अद्यापही ठोस उपायांच्या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.

शिवाजीवाडी, भारतनगरसह वडाळा गावालगत असलेले घरकुलदेखील विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. वर्षाच्या शेवटी पाथर्डी भागात शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या पाच दिवसीय शिव कथेने गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT