Murder news esakal
नाशिक

Nashik Crime: आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ गोणीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; खूनाचे गुढ मात्र अद्यापही कायम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.

सुलोचना उर्फ मोहन पवार असे मयत महिलेचे नाव असून तिच्या नातलगांमुळे ओळख पटली आहे. दरम्यान, तरीही नातलगांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, अद्यापही या महिलेच्या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांची तपासी पथके या खुनाचा उलगडा करण्यासाठी तपास करीत असून, काही पथके जिल्ह्याबाहेर रवाना झाली आहेत. (Body found in sack near University of Health Sciences identified mystery of murder still remains Nashik Crime)

गेल्या मंगळवारी (ता. २६) दिंडोरी रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांनी दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली असता, रस्त्यालगत टाकलेल्या गोणी सुलोचना पवार यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला हाेता.

सायंकाळी शवविच्छेदन अहवालानुसार महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. या मृतदेहाजवळ पिशवीत कपडे व भांडी होते. यासह मृतदेहाच्या गळ्यात एक पिवळ्या धातूच्या मण्यांचे मंगळसूत्र व कानात जोड आढळले आहे.

याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत महिलेची आई, भाऊ व मुलगा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नातलगांनी मृतदेह ओळखून तिचे नाव सुलोचना असल्याचे सांगितले. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवाशी आहेत.

दरम्यान, नातलगांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची यापूर्वीच दोन लग्ने झाली आहेत. दोन्ही नवऱ्यांनी मात्र तिच्याशी वैवाहिक संबंध तोडलेले आहेत. ती काहीशी वेडसर आणि सतत घर सोडून जात असल्याचे तिच्या नातलगांनी पोलिसांना सांगितले आहे.

मयत महिला ही फिरस्ती असल्याने तिचा खून का व कशासाठी करण्यात आला याबाबत अजून उलगडा झालेला नाही. नातलगांनी मृत महिलेची ओळख पटविली असली, तरी ‘डीएनए’ चाचणी करुन ओळख निश्चितीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT