Smriti Vishwas Narang Sakal Digital
नाशिक

Smriti Vishwas Narang: बॉलीवूडची 'मॉडर्न गर्ल' स्मृती विश्वास नारंग काळाच्या पडद्याआड

Smriti Vishwas Narang Death | स्मृती विश्वास यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1924 रोजी बांगलादेशातील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला होता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकेकाळी बॉलीवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांनी बुधवारी रात्री नाशिक रोडला 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाशिक रोड येथील चव्हाण मळ्यातील राहत्या घरी रात्री 9.00 वाजता त्यांचे निधन झाले.

स्मृती विश्वास यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1924 रोजी बांगलादेशातील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला होता. त्यांचे पती डॉक्टर एस. डी. नारंग हे जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्यासोबत त्यांनी 37 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आजपर्यंत 92 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लाहोर, कोलकाता, मुंबई, दिल्ली या ठिकाणी चित्रपटांमध्ये कामे केली.

बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून स्मृति विश्वास -नारंग यांचा उल्लेख केला जातो. त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. राज कपूर, राज बब्बर, सुनील दत्त, हेमामालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र, प्राण अशा नामवंत अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. त्यांची अनेक गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक बहीण आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार सकाळी आठ वाजता चव्हाण मळ्यातील त्यांच्या घरापासून निघणार असून सारडा सर्कल जवळील ख्रिस्ती स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

उदरनिर्वाहासाठी १५ हजारांत विकली होती ३ गाणी

स्मृती यांचे पती एस. डी. नारंग यांनी १९८५ ते ८७ या कालावधीत अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात वैष्णोदेवी आणि प्रेम गीत गाऊन घेतले होते. काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण झाला नाही. मात्र, या गाण्याचे सर्व हक्क स्मृती विश्वास यांच्याकडे होती. जुलै २०२३ मध्ये उदरनिर्वाहासाठी पंधरा हजार रुपयात तीन गाणे विकावी लागली होती. स्मृती विश्वास यांची दोन्ही मुलं अविवाहित असून नाशिकमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत ते राहतात. आईच्या उदरनिर्वाहासाठी ही गाणी विकावी लागली, अशी खंत त्यांच्या मुलांनी बोलून दाखवली होती.

‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’च्या इन्स्टाग्राम पेजवरील पोस्ट. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त खालील पोस्ट करण्यात आली होती.

१९३० मध्ये प्रदर्शित झालेला संध्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात स्मृती विश्वास यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. १९४० च्या सुमारास त्या लाहोर येथे गेल्या. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक – निर्माते दलसूख पांचोली यांनी 'धमकी' या चित्रपटात त्यांना संधी दिली. १९४३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

एस.डी. नारंग दिग्दर्शित नई भाभी (१९४४) या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. फाळणीनंतर स्मृती विश्वास या कोलकात्यात गेल्या. कोलकात्यात त्यांनी निरक्षर, अनुराग, अबू हसन अशा बंगाली चित्रपटांमध्ये काम केले.

वयाची चाळीशी गाठत असताना स्मृती मुंबईत आल्या. यानंतर त्यांनी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकांरासोबत काम केले. चांदनी चौक (१९५४), राज कन्या (१९५५), बाप रे बाप (१९५५), जागते रहो (१९५६), सैलाब (१९५६), मॉडर्न गर्ल (१९६१) या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT