NMC Latest News esakal
नाशिक

Nashik News: BOT मिळकत विकासाला पुन्हा हवा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भाजपच्या सत्ताकाळात बांधा, वापरा व हस्तांतरित करा तत्त्वावर मिळकती विकसित करण्याचा डाव उधळल्यानंतर आता पुन्हा नवीन आयुक्तांसमोर सल्लागार संस्था व मिळकत विभागाने मिळकती विकसित करण्याचे भूत पोतडीतून बाहेर काढले.

परंतु आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्यातील इतर महापालिकांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्याने मिळकती विकासाच्या निमित्ताने आर्थिक हित साध्य करणाऱ्यांचे डाव पुन्हा उधळले गेले आहेत. (BOT Income Development Needs Again Nashik News)

महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भाजप सत्ताकाळात महापालिकेच्या मिळकती ‘बीओटी’ वर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजपत्रकात दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले.

विनानिविदा सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली. सल्लागार संस्थेच्या प्रतिनिधींनी परस्पर बिल्डर आणण्याचे उद्योग सुरू केल्याने वादाला तोंड फुटण्याबरोबरच हेतूवरदेखील शंका घेतली गेली.

सर्वच राजकीय पक्षांबरोबरच तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी सदर प्रकरण फाइल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विनानिविदा नियुक्त करण्यात आलेली संस्थाच पात्र ठरली. आयुक्त जाधव यांची बदली झाल्यानंतर नियुक्त झालेल्या रमेश पवार व डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही या विषयाला त्यानंतर हात घातला नाही.

आता पुन्हा मिळकत विभागाने नियुक्त केलेली सल्लागार संस्थेचा अहवाल लक्षात घेऊन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या समोर सादरीकरण केले.

प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती घेऊन तसेच मिळकत विकसित करताना कायदेशीर सल्ला घेण्याच्या सूचना आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT