Nashik Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणूकीत अर्ज छाननीदरम्यान माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या अर्जावर शिवाजी चूंभळे व अनिल ढिकले यांनी हरकत घेतली होती.
त्यावरील सुनावणीत गुरूवारी (ता. ६) या दोन्ही हरकती फेटाळल्या असून, पिंगळे यांचे नामनिर्देश अर्ज क्रमांक १९ व २० वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आता १३७ उमेदवारांचे १७० अर्ज वैध ठरले आहेत. (Both objections against former MP Pingle rejected 170 applications valid under scrutiny Nashik Market Committee Election Nashik News)
नाशिक बाजार समिती निवडणुकीत आजी- माजी खासदार आमने-सामने असले, तरी खरी लढत ही पिंगळे व चुंभळे यांच्यातच होणार आहे. बुधवारी (ता. ५) अर्जांच्या छाननीवेळी चूंभळे गटाने पिंगळे यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
या हरकतींवर गुरूवारी सकाळी अकराला निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यावेळी हरकतींवर उत्तर देताना श्री. पिंगळे म्हणाले, की छाननीमध्ये निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाबाबत घ्यावयाचा निर्णय हा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असतो.
उमेदवाराची अपात्रता जाहीर करण्याचा अधिकार निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना नाही. केवळ सक्षम प्राधिकरणाचा अथवा कोर्टाचा आदेश असल्यासच उमेदवारी अर्जाबाबत निर्णय घेता येईल. तसेच, उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका २९ मार्चला निकाली काढलेली आहे.
त्यात पिंगळेंवर निश्चित केलेले जबाबदारीचे आदेश पणन संचालकांनी रद्द केलेले आहेत. त्यातच, १० एप्रिलला होणाऱ्या सुनावणीचा निर्णय अद्याप बाकी आहे. हरकत अर्ज हा मुदतपुर्व आहे. या सर्व बाबींचा व नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता श्री. चुंभळे यांच्या हरकत अर्जानुसार पिंगळे यांना निवडणूक लढविण्यापासुन दुर ठेवणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होणार नाही.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
या सर्व बाबी लक्षात घेत निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी पिंगळे यांचे अर्ज वैध ठरविले आहेत. या निर्णयाविरोधात तीन दिवसांत जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.
छाननीत १७० अर्ज वैध
दरम्यान, उमेदवारी अर्जांच्या छाननीत सहकारी संस्था मतदार संघातील एकुण १०६ अर्ज (सर्वसाधारण- ७०, महिला राखीव- १६, इतर मागास वर्गीय- १३, विमुक्त जाती विमुक्त जमाती- ७). ग्रामपंचायत मतदार संघातील ४३ अर्ज (सर्वसाधारण- २१, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती- १६, आर्थिक दुर्बल घटक- ६). व्यापाऱ्यांचा मतदार संघात १८ अर्ज व हमाल- तोलारी मतदारसंघात ३ अर्ज वैध ठरले आहेत.
खर्चाची मर्यादा एक लाखपर्यंत
तालुकास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक काळात खर्चाची कमाल मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत घालून देण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून मतमोजणीपर्यंतचा एकुण खर्च सादर करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.