Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
नाशिक

Onion News: कांदाप्रश्नात उतरले दोन्ही पवार! शरद पवार म्हणतात निर्यातशुल्क हटवा; अजित पवारांच्या बैठका

सकाळ वृत्तसेवा

Onion News : जिल्ह्यातील कांदाप्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच आग्रही राहतात. मात्र, शरद पवारांपाठोपाठ आता त्यांचे पुतणे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही हा प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांसोबत अजित पवारांनी बैठक घेतली. शरद पवारांनी निर्यातशुल्क हटविण्याची मागणी केली.

त्यामुळे प्रश्न कांद्याचा असला तरी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आपापला गट शाबूत ठेवण्यासाठी दोन्ही पवार सरसावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Both Pawar into onion issue Sharad Pawar says remove export duty Ajit Pawars meetings over onion issues nashik)

देशात उत्पादित होणाऱ्या एकूण कांद्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात ४० टक्के उत्पादन होते. त्यामुळे नाशिकच्या कांद्याला जागतिक मागणी असते. ज्या वेळी कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा शरद पवारांनी यात लक्ष घातले.

सत्तेत असो किंवा नसो, पवारांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्यावर कायमच शेतकरी शरद पवारांना साकडे घालतात. पवार दिल्ली दरबारी आपले राजकीय वजन वापरत या प्रश्नांची सोडवणूक करत आले आहेत.

राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार यापासून कायम दूर राहायचे. पण आता राष्ट्रवादीतच उभी फूट पडल्यानंतर आपल्या गटाचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी दोन्ही गटांनी कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मंगळवारी (ता. २६) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. लागलीच सायंकाळी सातला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासमवेतही बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

यावर अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील आमदारांनी गळ घातली म्हणून आपण या प्रकरणात लक्ष घातल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे अजित पवारांची पहिली बैठक झाल्यानंतर सायंकाळी दुसरी बैठक होणार असल्याने या दरम्यानचा वेळ साधत शरद पवारांनी लागलीच पत्रकार परिषद घेत कांदाप्रश्नाला हात घातला. कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटविण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

नाशिक जिल्हा तसा शरद पवारांना साथ देणारा. मात्र, पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील सहा आमदारांनी अजित पवार गटाची वाट निवडली.

याही परिस्थितीत शरद पवारांनी फूट पडल्यानंतरचा पहिला मेळावा येवल्यात घेऊन नाशिक जिल्हा आपल्यासोबत असल्याचे दाखवून दिले. अजित पवारांनीही नाशिकमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला वरचष्मा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

यातून राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई निर्माण झाली आणि कांदाप्रश्नातून ‘काका-पुतण्यांनी’ हाच वरचष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT