Rape News esakal
नाशिक

Nashik Crime News : विनयभंग, अत्याचार प्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडको आणि नाशिक रोड परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग व अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र आबाजी जगताप (वय ५६, रा. उत्तमनगर, सिडको), मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (वय ४५, रा. सुभाष रोड, नाशिक रोड), अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. (Both were sentenced to hard labor in case of rape torture Nashik Latest Crime News)

सिडकोतील उत्तमनगर येथे पहिली घटना २७ ऑक्टोबर २०२१ ला सायंकाळी घडली होती. आरोपी रवींद्र जगताप याने दहावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी मुलीच्या आईने अंबड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध विनयभंगासह पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबडचे पोलिस उपनिरीक्षक एच. एस. पावरा यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. गोरे यांनी युक्तिवाद केला. आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्यास तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सी. एम. सुळे, आर. आर. जाधव यांनी कामकाज पाहिले. तर दुसरी घटना नाशिक रोडच्या सुभाष रोड भागात घडली होती.

या प्रकरणात आरोपी मनोज श्रीवंत याने ११ नोव्हेंबर २०१८ ला चिमुकल्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मुलाच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, आरोपी मनोज याने घरात एकटा असलेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात अत्याचारासह पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद करीत नऊ साक्षीदार तपासले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपी मनोज यास तीन वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT