boy committed suicide a few days after his girlfriend committed suicide Sakal
नाशिक

प्रेयसीपाठोपाठ त्यानंही सोडलं जग; सिडको परिसरातील घटना

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : दुचाकी चोरीच्या संशयावरून अंबड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकाने घरी जाऊन विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. काही दिवसांपूर्वी प्रेयसीने आत्महत्या केली होती.

अंबड पोलिसांच्या चौकशीनंतरची घटना

आफ्रोज हसन चौधरी (वय २०) व त्याचा मित्र हमिद हरून खान (१९, रा. शिवपुरी चौक, उत्तमनगर) शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोरवाडी स्मशानभूमी रस्त्यावरून विनाक्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवरून जात असताना, पोलिसांना मिळून आले. चोरीची गाडी असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. आफ्रोज चौधरी याच्याविरुद्ध यापूर्वी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ दुचाकीची कागदपत्रे नव्हती. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या भावाला बोलाविण्यात आले. नंतर समज देऊन दोघांनाही सोडून दिले. शनिवारी (ता.१६) सकाळी दहाला दुचाकीची कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात हजर होण्याची समज पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिस ठाण्याबाहेर पडल्यानंतर दोघांपैकी आफ्रोज याने रात्री एकच्या सुमारास घरातच विषप्राशन करून आत्महत्या केली. आफ्रोजचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेयसीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. याच मानसिक तणावात आफ्रोज होता. यामुळेच मानसिक तणावामध्ये येऊन त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT