beating esakal
नाशिक

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकराने घातला बुरखा अन् घडले भलतेच...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रेमासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. असाच एक तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी वडाळा गावात बुरखा घालून आला खरा, परंतु त्याची ही शक्कल त्याच्या अंगलट आली. सध्या शहरात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने त्याचा फटका या प्रेमवीराला बसला.

जमावाने बेदम चोप दिला. सुदैवाने घटनास्थळी पोलिस आल्याने त्याचा जीव वाचला. त्याची सुटका तर झाली, तसेच प्रेयसीला भेटण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. (boyfriend wear burkha to meet his girlfriend Beaten by mob mistaking them for abductors Nashik Latest Marathi News)

गेल्या आठवड्यात मुले पळविणारे समजून उपनगराच्या बोधलेनगरला दोघा ब्लँकेट विक्रेत्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला. तर, भद्रकालीतही दोघा तरुणांना याच संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, वडाळा गावात घडलेली घटना म्हणजे कळसच. वडाळा गावातील गणेशनगर भागात एक युवक त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला होता.

मात्र, आसपासच्या जागरूक नागरिकांच्या लक्षात सदर बाब आल्याने बुरख्याच्या आतमध्ये युवक असल्याने नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्याच्या अंगातील बुरखा फाडून त्याचा चेहरा पाहण्यासाठी नागरिकांनी त्याला रस्त्यावर खाली पाडून बेदम मारहाण करीत असल्याचा सोशल मीडियावर व्हायरलवर व्हिडिओतून दिसते आहे.

76त्याचवेळी पोलिस वाहन जात असल्याने जमलेला जमाव पाहून पोलिस आले. त्यांना उपस्थितांनी घडलेला प्रकार विशद केल्यानंतर पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्या युवकाने बुरखा घालण्यामागील कारण सांगितल्यानंतर पोलिसांनाही हसावे की रडावे, असे झाले.

दरम्यान, सध्या शहरात लहान मुले पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे कुठे काही संशयास्पद दिसले, की नागरिक संबंधिताला बेदम मारहाण करीत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मुले पळविणाऱ्या टोळीसंदर्भात सावधगिरीचे संदेश व्हायरल करण्यात आले आहेत. या संदेशामुळे समाजात चुकीचा संदेश गेल्याने आत्तापर्यंत तीन- चार घटनांमध्ये विनाकारण जमावाकडून बेदम मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. अशी कोणतीही टोळी शहरात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा व्हायरल संदेशावर विश्‍वास ठेवू नये. तसेच, संशयावरून विनाकारण कोणालाही मारहाण करू नये. यातून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे आवाहन शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT