Bribe Case esakal
नाशिक

Nashik Bribe Cases: ACBकडून राज्यभरात अवघे 6 गुन्हे दाखल; नाशिकमध्ये एकही नाही! ‘अपसंपदे’ची कारवाई नगण्य

नरेश हाळणोर

Nashik Bribe Cases : राज्यभरात गेल्या सात महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आकडा पाचशेवर पोचला आहे. पाचशे-हजारांची लाच आता लाखोंच्या घरात पोचली आहे.

एकीकडे लाखोंची लाच घेत अधिकाऱ्यांकडून बेहिशोबी ‘माया’ जमा केली जाते, तर दुसरीकडे मात्र राज्यभरात अशी माया जमा केलेल्या लाचखोरांविरोधातील ‘अपसंपदे’चे अवघे सहाच गुन्हे दाखल झाले आहेत.

यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ‘क्षमते’वरच प्रश्नचिन्ह उभे राहाते आहे. विशेषतः राज्यात सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे नाशिक विभागात दाखल झालेले आणि यात ‘मोठे मासे’ असूनही एकही अपसंपदेचा गुन्हा ‘लाचलुचपत’ला दाखल करता आलेला नाही. (Bribe Cases Only 6 cases filed by ACB across state none in Nashik)

किरकोळ कामांपासून ते शासकीय ठेक्यांच्या कामांपर्यंत शासकीय अनेक अधिकारी-कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाही म्हणून नाइलाजाने लोक अशी रक्कम देण्यास बळी पडतात.

कामांच्या टक्केवारीतून लाखोंची लाच स्वीकारणारे उच्चपदस्थ अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात सापडत आहेत. मात्र, कठोर कायद्याअभावी आणि दोषसिद्धीचे अत्यल्प प्रमाण यामुळे लाचखोरांचे पुन्हा पुनर्वसन होते. त्यामुळे अलीकडे लाच घेण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे.

यंदा, गेल्या सात महिन्यांत राज्यात लाचखोरीच्या प्रकरणात ७६२ लाचखोरांविरोधात ५२० गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र यामध्ये अपसंपदेचे अवघे सहा गुन्हे दाखल आहेत.

त्यातही मुंबईत चार, पुणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी एक-एक, असे सहा गुन्हे आहेत. परंतु राज्यात लाचखोरीमध्ये १०४ गुन्ह्यांसह आघाडीवर असलेल्या नाशिक विभागात मात्र एकही अपसंपदेचा गुन्हा दाखल न झाल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिकचा गवगवाच फार

राज्यात लाचखोरीमध्ये सध्या नाशिक विभागाचा डंका आहे. लाखो रुपयांची लाच स्वीकारणारे शासकीय अधिकारी नाशिक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. त्यामुळे नाशिक विभागात सर्वाधिक लाचखोरीचे १०४ गुन्हे दाखल आहेत.

वर्ग एकचे शासकीय अधिकारी लाखोंची लाचखोरीत अडकल्याने नाशिक विभागाचा राज्यात गवगवा फार झाला. परंतु त्याचवेळी अशा अधिकाऱ्यांविरोधात अपसंपदेचा गुन्हा मात्र दाखल करण्यात अपयश आलेले आहे, हेही तितकेच सत्य आहे.

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (३० लाख), आदिवासी विभागाचा दिनेश बागूल (२८ लाख ५० हजार), भूमिअभिलेखचा अधीक्षक महेशकुमार शिंदे (५० हजार), सिन्नरचा सहाय्यक उपनिबंधक एकनाथ पाटील (१५ हजार ५००), सिन्नरचा सहाय्यक निबंधक रणजित पाटील (२० लाख), महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (५० हजार) व नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास १५ लाखांची लाच घेताना अटक झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यांसह विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यातीही मोठे मासे गळाला लागले आहेत. परंतु यापैकी एकाच्याही विरोधात ‘लाचलुचपत’ने अपसंपदेचा गुन्हा दाखल केलेला नाही.

त्यामुळे या लाचखोरांचे उखळ भरलेलेच राहात असल्याने तीन महिन्यांनंतर ते पुन्हा सेवेत रुजू होतात. यामुळे सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याच्या तक्रारीही एसीबीकडे येत आहेत.

राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी

वर्षे ........... लाचखोरीचे गुन्हे ........ अपसंपदेचे गुन्हे

२०२० .......... ६३० ........... १२

२०२१ ........... ७६३ .......... ७

२०२२ ........... ७२८ ......... १२

२०२३ (आत्तापर्यंत) ..... ५१२ ....... ६

"यंदाच्या वर्षात लाचखोरीच्या मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत एकही अपसंपदेचा गुन्हा दाखल झालेला नाही. काही प्रकरणात तपास सुरू आहे."

- शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, नाशिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Hitendra Thakur: तावडे पैसे देताना कुणाला घावले? २५ फोन, ५ कोटी अन् सर्व प्रकरण बाहेर काढणारे हितेंद्र ठाकूर कोण?

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Nanded South Assembly constituency : नांदेड-दक्षिण मतदारसंघात विजयश्री कोणाला घालणार माळ, नवीन चेहऱ्याचा ट्रेंड कायम राहणार का?

Flipkart Mobiles Bonanza Sale : महागड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; सुरू झाला फ्लिपकार्टचा Bonanza सेल, ऑफर्स पाहा

Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

SCROLL FOR NEXT