नाशिक : लाच प्रकरणी (bribe case) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर (vaishali veer jhankar) यांच्या जामिनावर शुक्रवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे. तसेच न्यायालयाने जिल्हा रुग्णालयाला नोटीस बजावून वीर-झनकर यांच्यावरील उपचाराची माहिती मागवली आहे.
जिल्हा रुग्णालयातील उपचारावर संशय?
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वीर-झनकर आणि चालकासह शिक्षकाला पकडले होते. त्यानंतर रात्री गुंगारा देणाऱ्या वीर-झनकर दोन दिवस पोलिसांना सापडल्या नव्हत्या. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली होती. दोनदा त्यांनी आजारासाठी रुग्णालयात जाणे पसंत केले होते. न्यायालयातील युक्तिवादावेळी सरकारी पक्षातर्फे त्यांच्या जामिनास विरोध दर्शविण्यात आला. त्यांच्या जिल्हा रुग्णालयातील उपचारावर संशय व्यक्त करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाकडून संशयितांना पाठबळ दिले जाते, असाही आरोप सरकार पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी दोन दिवस पुढे ढकलली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.