Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : पाथरेचा लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : गावठाण मधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात पन्नास हजारांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पात्रे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. (Bribery village sevak of Pathare arrested red handed Nashik Bribe Crime news)

नितीन सगाजी मेहेरखांब (42, रा. त्रिमूर्ती चौक, संगमनेर, जि. अहमदनगर) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे पाथरे, खुर्द (ता. सिन्नर) येथे गावठाण हद्दीत जुने घर असून त्यांनी सदर घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत बांधले.

सदर गावठाणमधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायतप्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात लाचखोर ग्रामसेवक मेहेरखांब याने तक्रारदारांकडे आज (ता 12) पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तकारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये देण्याचे बुधवारी रात्री ठरले त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका हॉटेलमध्ये संशयित लाचखोर मेहेरखांब याने तक्रारदारांकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मेहेरखाम यास रंगेहात अटक केली याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक साधना इंगळे , सचिन गोसावी. प्रफुल्ल माळी. परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT