Vegetable Market News esakal
नाशिक

Nashik News : वाघाडी पुलाची डागडुजी गरजेची; भाजी मंडईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्री काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाकडून गणेशवाडीकडे येणाऱ्या वाघाडी नाल्यावरील पुलाची सध्या दुरवस्था झाली आहे. पुलाला काही ठिकाणी खड्डे पडले असून संरक्षक कठड्यामधील लोखंड काढून नेल्याने तेही धोकादायक स्थितीत आहेत. याशिवाय गणेशवाडीत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भाजी मंडईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. (bridge over Waghadi is in bad condition Neglect of MNC towards vegetable market Nashik news)

ऐंशीच्या दशकात काळाराम मंदिराकडून गणेशवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी असलेल्या छोट्या पुलाला राममंदिराच्या बाजूने पायऱ्या असल्याने केवळ पायी जाता येत होते. मात्र, त्यानंतर या पुलावरून सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली.

मात्र गत तीस पस्तीस वर्षांत पुलाची डागडुजी न झाल्याने पुलाला काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय संरक्षक कथड्यांमधील किरकोळ लोखंडासाठी भुरट्या चोरट्यांनी सिमेंटचे खांब तोडल्याने हा पूल आणखी धोकादायक बनला आहे.

महत्त्वाचे म्हणजे याभागात नागरी वस्ती असून लहान मुलेही या पुलावर खेळत असतात, त्यामुळे संभाव्य दुर्घटनेपूर्वीच संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी येथील स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

भुरट्यांचे लक्ष्य

गंगाघाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी गाडगे महाराज पुलालगत अद्ययावत भाजी मंडई उभारण्यात आली. परंतु सुरवातीपासूनच मंडईकडे विक्रेत्यांनी दुर्लक्ष केल्याने मंडईचे बांधकामही वादात सापडले. सध्या मंडईच्या अर्ध्या भागात भाजी व फूल विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केला.

मात्र उर्वरित भागाचा ताबा भिकारी व गर्दुल्यांनी घेतल्याने मंडईला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच येथील लोखंडी रेलिंग, दरवाजे, ओट्यांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले लोखंड भुरट्यांनी चोरून नेले आहे. येथे राहणारे मंडईतच प्रातर्विधी करत असल्याने दुर्गंधीही पसरली आहे.

"गणेशवाडीतील भाजी मंडईतील लोखंडी दरवाजे, रेलिंग व अन्य सामान भुरट्या चोरट्यांनी लांबविले आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीसारखीच सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी." - उल्हास धनवटे, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT