सौंदाणे : पीरसाहेब बाबा कि जय, राजुबा दादा कि जय, पैलवान दादा की जय, यळकोट यळकोट जय मल्हार च्या जय घोषात हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करून सौंदाणे येथे गुढीपाडवा निमित्त ग्रामदैवत पीरसाहेब महाराज यांचे यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.
यात्रोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर, पीरसाहेब मंदिर, राजुबा दादा मंदिर, पैलवान दादा मंदिर येथे नैवेद्य व नारळ फोडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पहावयास मिळाली. (broken tradition after 3 years continues Chariots pulled in Saundane Pir Saheb Yatra nashik news)
सौंदाणे येथे गुढीपाडवानिमित्त ग्रामदैवत पिरसाहेब महाराज यांचा यात्रोत्सवात सुरवात झाली आहे. तीन वर्षापूर्वी बारागाड्या ओढत असताना मानकरी सोबत असलेल्या गोपाळाचा झालेला अपघाती मृत्यू यामुळे सौंदाणे गावात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
मात्र तीन वर्षांनी पुन्हा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी पाचला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. गुरवारी (ता.२३) दुपारी श्री राजूबा दादा मंदिराजवळ बारागाड्या ओढण्याचे मानकरी यांची विधिवत पूजा करण्यात आली.
यंदाच्या बारागाड्या ओढण्याचा मान मिळालेल्या मानकऱ्याची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन सायंकाळी सहाला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. बारागाड्या ओढण्याचा मान लाभलेले बबलू गांगुर्डे यांनी हनुमान मंदिरापासून पूर्वेकडील असलेल्या पीरसाहेब महाराज यांचे मंदिराकडे ग्रामदेवातांचा जयघोष करत बारागाड्या ओढल्या. सौंदाणे गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यावेळी गर्दी केली होती.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
आज कुस्ती दंगल
बारागाड्या ओढल्या नंतर हनुमान मंदिर ते पीरसाहेब मंदिर पर्यंत संपूर्ण मंदिर परिसरात भंडारा उधळण्यात आला. पिरसाहेब महाराज की जय , राजुबा दादा की जय , पैलवान दादा की जय, बोला खंडेराव महाराज कि जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ग्रामस्थ व ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा सादर झाला. शुक्रवारी (ता.२४) कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कमी वयात मिळाला मान
सौंदाणे (ता.मालेगाव) येथील बारागाड्या ओढण्याचे मानकरी असलेले बबलू गांगुर्डे हे अवघे २६ वर्षाचे आहेत. गावामध्ये आत्तापर्यंत एवढ्या कमी वयात बारागाड्या ओढण्याचा मान कोणालाही मिळाला नव्हता. या वयात बारागाड्या ओढण्याचा मान मिळाल्याने बबलू गांगुर्डे यांची संपूर्ण गाव व परिसरात कौतुकाची चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.