Godavari river nashik esakal
नाशिक

Namami Goda Project : प्रशासकीय गटांगळ्यात अडकला प्रकल्प; प्रकल्पाचे बजेट वाढले तब्बल 1 हजार कोटींनी

विक्रांत मते

Namami Goda Project : आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने शहर विकास व गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या नमामी गोदा प्रकल्पाची घोषणा होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी अद्यापही प्रकल्प प्रशासकीय कामकाजात गटांगळ्या खात आहे.

सिंहस्थापर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नदी स्वच्छता हा विषय वर्ष- दोन वर्षांत संपणारा नाही. त्यापेक्षा अधिक कालावधी लागेल. असे असताना प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यास लागणारा विलंब शहर विकासाला मारक ठरणार आहे.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा भरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नमामी गोदा प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी जलशक्ती मंत्रालयातर्फे जवळपास एक हजार ८५३ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. (budget of Namami Goda project increased by 1 thousand crores nashik news)

या प्रकल्पात प्रामुख्याने नदी स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे. शहरातील नदी-नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी नदीपात्रात न जाता ते संकलित करून मलनिसारण केंद्राकडे वळविले जाईल.

त्याचबरोबर अहमदाबादच्या साबरमती नदी प्रकल्पाच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, जैवविविधता जपणे, विविध घाटांचे नूतनीकरण करणे तसेच दहनभूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीचा वाहता प्रवाह स्वच्छ ठेवणे, नदीकिनारी व घाटांवर असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, नदी प्रवाहातील जलचरांची निगा राखणे व जतन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, जलचरांच्या विविध प्रजाती पूर्ववत करणे व त्यांचे संवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे.

सद्यस्थितीत नाशिक शहरात तपोवन, आगरटाकळी, पंचक, चेहडी व गंगापूर या पाच ठिकाणी मलनिसारण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. पिंपळगाव खांब येथे अमृत योजनेंतर्गत मलनिसारण केंद्राचे काम पूर्ण झाले.

उर्वरित कामटवाडे व मखमलाबाद या दोन ठिकाणी मलनिसारण केंद्रांसाठी मंजूर विकास योजनेत आरक्षण दर्शविण्यात आले आहे. मखमलाबाद व आगरटाकळी सिव्हरेज झोनसाठी दोन्ही ठिकाणी येथे सिंहस्थापूर्वी मलनिसारण केंद्र बांधणे आवश्यक ठरेल. त्यासाठी प्रथम भूसंपादन केले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाइनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी ‘एसटीपी’च्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा समावेश आहे. दरम्यान, नमामी गोदा प्रकल्प तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. त्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली.

काय आहे प्रकल्पाची स्थिती?

सद्यस्थितीत सल्लागार संस्थेमार्फत शहरातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था, पावसाळी पाणी वाहून नेण्याची व्यवस्था व इतर नागरिकांना पुरविण्यात येणारे सुविधांचे जीआयएस मॅपिंग करून बेस मॅप तयार करण्यात आला आहे.

नगर नियोजन विभागाकडून ड्रोन सर्वे करण्याचे काम रखडले. मलनिस्सारण तसेच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, जवळपास दोन हजार ७८० कोटी रुपये खर्चाचा अहवाल तयार झाल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

काय आहे प्रकल्पात?

- नदीकाठच्या १५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिकांची दुरुस्ती.

- मलवाहिकांची क्षमतावाढ.

- मखमलाबाद येथे प्रतिदिन ४५ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र.

- कामटवाडे येथे ५४ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र.

- नवनगरांमध्ये मलवाहिका टाकणे.

- गोदाकाठाचे सुशोभीकरण व घाट विकास.

- शुद्ध केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे.

प्रकल्पातील अडथळे

- ऑगस्ट २०२१ मध्ये प्रकल्पाची घोषणा.

- स्वारस्य देकार मागविले त्यात २०० हून अधिक त्रुटी.

- मंजुरीपूर्वीच महासभेच्या मागच्या दाराने प्रकल्पाचा ठराव मंजुरीवरून संशय.

- नाशिकस्थित एजन्सीचा प्रस्ताव ‘नमामी गोदा’त समाविष्ट केल्याने वाद.

- ड्रोन सर्वेअभावी रखडला प्रकल्प.

- लोकनियुक्त प्रतिनिधींअभावी महापालिकेचे कामकाज असल्याने पाठपुरावा करण्यात अडचण.

"गंगा नदीच्या धर्तीवर गोदावरी नदी व घाटांचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रकल्प मंजूर केला आहे. आतापर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करून केंद्र सरकाकडे जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासनाकडून वेगाने काम का होत नाही, हे समजत नाही. जवळपास दोन हजार कोटी रुपये निधी या माध्यमातून मिळतील. प्रशासकीय विलंबामुळे नुकसान होत असेल तर याबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे." - सतीश कुलकर्णी, माजी महापौर

"‘नमामी गोदा’ हा भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा निधी प्राप्त होईल. या निधीतून गोदावरी स्वच्छतेबरोबरच वाढत्या शहरात मलनिस्सारण व्यवस्थाही भक्कम होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामाला सुरवात होणे गरजेचे आहे." - गणेश गिते, माजी सभापती, स्थायी समिती

"नमामी गोदा’ प्रकल्पाच्या बजेटचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून, तो जवळपास दोन हजार ७८० कोटी रुपयांचा आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. मलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रकल्प महत्त्वाचा आहे." - उदय धर्माधिकारी, माजी अधीक्षक अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT