Builder Naresh Karda arrested in fraud case nashik crime news esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : सव्वा कोटीच्या फसवणूकप्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : शहरातील नामांकित बिल्डर कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्याविरोधात १ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुंबई नाका पोलिसात राहुल लुणावत (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुणावत यांच्या फिर्यादीनुसार, नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे. ( Builder Naresh Karda arrested in fraud case nashik crime news)

कारडा कन्स्ट्रकशनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी २०१९ मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत व त्यांचा मित्र सतीश कोठारी यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी तक्रारदारांकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले होते.

बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तक्रारदारांनी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेतली असता, या ठिकाणी कोणताही बांधकाम प्रकल्प अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारडा यांच्या पैशांसाठी तगादा लावला.

परंतु कारडा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आली आहे.

हा गुन्हा शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, सहायक पोलिस आयुक्त भगीरथ देशमुख हे तपास करीत आहेत.

फसवणुकीच्या अनेक तक्रारी

शहरातील नामांकित कन्स्ट्रक्शन फर्म म्हणून एकेकाळी कारडा कन्स्ट्रक्शनचे नाव घेतले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये नरेश कारडा यांच्याकडून बुकिंगचे पैसे घेऊनही ग्राहकांना मालमत्तेचा ताबा दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याच्या कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये काहीनी कोट्यवधींची आर्थिक गुंतवणूकही केली आहे.

त्यांनाही नरेश कारडा यांनी गंडा घातल्याची चर्चा असून सुमारे ४० ते ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. कारडा कन्स्टक्शनकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT