Grapes News esakal
नाशिक

Grapes Rate News : जूनमध्ये सूर्य तळपल्यास द्राक्षांचे ‘बंपर क्रॉप’!

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हवामानशास्त्र विभागाने जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळाल्यास काडीमध्ये फलधारणा चांगली होण्यास मदत होईल.

यातून द्राक्षांचे ‘बंपर क्रॉप’ येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात सर्वत्र मेच्या मध्याला खरड छाटणीची कामे पूर्ण झाली आहेत. (Bumper crop of grapes if sun shines in June Rough pruning over acre cost of grapes has increased by twenty percent this year Nashik News)

राज्यामध्ये चार लाख एकर, तर जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्ष घेतले जातात. यंदाच्या हंगामात पाऊस, गारपीट, मणी तडकणे, भाव कोसळणे, निर्यात अशा अनेक अडचणींमुळे ‘कोल्ड स्टोरेज’मधील द्राक्षांना चांगला भाव मिळाला.

तथापि यंदा बहुतांश कोल्ड स्टोरेज मोकळेच होते. तेथील द्राक्षांचे प्रमाण जेमतेम ३० टक्के होते. त्यामुळे चांगल्या भावाचा फायदा खूपच कमी जणांना झाला. शेतकऱ्यांना सर्वसाधारपणे २० ते २५ रुपयांचा फटका सहन करावा लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परतीच्या मॉन्सूनची साथ अपेक्षित

द्राक्षांमध्ये १५ ते २० टक्के बागांमध्ये ‘अर्ली’ उत्पादन घेतले जाते. तेवढ्याच बागा ‘लेट’ असतात. नियमित उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत आहे. यंदा परतीच्या मॉन्सूनची साथ मिळाल्यास द्राक्षांचा हंगाम सुस्थितीत राहील, असे शेतकऱ्यांचे आडाखे आहेत.

‘लेट’ हंगाम धरणाऱ्या बागांना फारशी विश्रांती दिली जात नाही. १० जूनपर्यंत पंढरपूरसह काही भागांतील द्राक्षे बाजारात विक्रीसाठी येतात. पण यंदा द्राक्षे लवकर संपल्याने याही भागातील खरड छाटणीची कामे उरकली आहेत.

एकरी खर्चात २० टक्क्यांची भर

मजुरी, खते, औषधांमुळे द्राक्षांच्या उत्पादनातील एकरी खर्चात दर वर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे. खरड छाटणीनंतर मालकाडी तयार करण्यासाठी ‘सबकेन’, बगल फुटी काढणे या कामांमध्ये शेतकरी कुटुंब व्यस्त आहे.

खरड छाटणीसाठी एकराला अडीच ते तीन हजार, ‘सबकेन’साठी अडीच ते तीन हजार, बगल फुटी काढण्यासाठी अडीच ते तीन हजार असा खर्च करावा लागत आहे.

शेंडा टॅपिंगसाठी दीड ते दोन हजार रुपये द्यावे लागतात. एकूणच मजुरीवर एकराला २० हजार रुपये खर्च होणार आहेत. शेणखताचा एकरी खर्च ४५ ते ५० हजार रुपये आहे, ‘लिक्विड’ खतांसाठी दहा ते १५ हजार रुपये मोजावे लागतात.

"निर्यातक्षम द्राक्षांच्या बागांची नोंदणी ऑनलाइन प्रणालीवर होते. निर्यातीसाठी द्राक्षांच्या काढल्या जाणाऱ्या नमुन्यांच्या तपासणीची नोंद केली जाते.

मात्र ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये किती द्राक्षे ठेवण्यात आली आहेत, याची नोंद कुठेच केली जात नाही. त्यामुळे आता ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये ठेवलेल्या द्राक्षांची नोंद व्हायला हवी."

- कैलास भोसले (उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT