onion farming esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे बंपर पिक; 2 लाख हेक्टरवर विक्रमी लागवड

रोशन भामरे

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : यंदा समाधानकारक पावसामुळे सर्व भागात असलेले मुबलक पाणी आणि दोन वर्षापसून कांद्याला मिळालेला दर यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाबद्दल वाढलेल्या अपेक्षा सर्वच गोष्टींचा सारासार विचार करुन यावर्षी नाशिक जिल्ह्यातील बळीराजाने एक लाख ९० हजार ३०६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळा कांदा पिकांची लागवड केली आहे. एरवी डिसेंबरअखेरीस संपुष्टात येणारी उन्हाळ कांदा लागवड यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. यावर्षी बदलते ऋतुमान, रोपांची उशिरा पेरणी यामुळे कांदा लागवड हंगाम लांबणीवर पडला असला तरी कांद्याला अपेक्षित असलेली थंडी टिकून असल्याने उशिरा लागवड झालेल्या कांद्याच्या भरघोस उत्पादनाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब

दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी दुपटिने मजुरीचे दर देऊन यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मागील वर्षीचा कांदा दराचा वाढता अनुमान लावत मजुरांनी यावर्षी कांदा लागवडीचे दर एकरी १२ ते १४ हजार मजुरी घेतल्याने कांदा उत्पादन खर्च हा दुपटीने वाढणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कांदा उत्पादन वाढणार आहे. त्या तुलनेत कांद्याचे दर आजच मोठ्या प्रमाणात पडले आहेत. कांद्याला आगामी दोन महिने पोषक वातावरण मिळाले तर मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादनात वाढ होऊन आगामी काळात कांदा दराचे भवितव्य बे- भरवशाचे राहणार आहे, असे जाणकरांकडून बोलले जात असले तरी आगामी दोन महिन्यातील वातावरण, बेमोसमी पाऊस यावरच कांद्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
यंदा उशिरापर्यंतच्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली. त्यामुळे तीन ते चारवेळा शेतकऱ्यांना बियाणे विकत घेऊन टाकावी लागली. वाढत्या महागाईमुळे मशागत, मजुरी व खतांचे भाव गगनाला भिडल्याने यंदा उत्पादकांच्या खर्चात मात्र खूप मोठी वाढ झालेली आहे.

४८ हजार ८३० हेक्टर क्षेत्रात वाढ

गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यात एक लाख ४१ हजार ४७६ क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात मोठी वाढ झाली असून, एक लाख ९० हजार ३०६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. म्हणजेच चालूवर्षी ४८ हजार ८३० हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. तर पोषक हवामान व शेतकऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे यंदा कांदा पीक जोमात आहे.

तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टरी)

मालेगाव २११७४
सटाणा ४९१००
नांदगाव १०६२७
कळवण २१३१३
देवळा १९२९६
दिंडोरी १७८७
सुरगाणा ४१४
नाशिक ११९७
त्र्यंबकेश्वर ७६
इगतपुरी ९०
निफाड १४०८२
सिन्नर ५३९८
येवला २६८३२
चांदवड १८९१९

''यंदा सुरवातीच्या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना तीन ते चारवेळा बियाणे टाकावे लागले. ऐन लागवडीच्या काळात वाढलेल्या खतांच्या किमती, महागाईमुळे वाढलेली मजुरी अशा कारणामुळे कांदा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. सरकारने येणाऱ्या कांदा उत्पादनाचे आत्ताच नियोजन करावे.'' - राकेश खैरनार, कांदा उत्पादक, तळवाडे दिगर

''यावर्षी रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्यामुळे देशात कांदा टंचाई निर्माण होणार नाही. बियाणे, खते, औषधे व मजुरीचे भाव वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.'' - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT