burglary News esakal
नाशिक

Nashik Crime News : आणखी 2 घटनांसोबतच शहरात घरफोडीचे सत्र सुरूच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक परिसरामध्ये घरफोड्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. शहरात पुन्हा दोन घरफोड्या झाल्या असून, यात चोरट्यांनी १ लाख ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर व गंगापूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Burglary season continues in city with 2 more incidents Nashik Crime News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

अभिषेक प्रमोद रानडे (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २२ ते २७ तारखेदरम्यान त्यांच्या बंद घराच्या किचनच्या खिडकीचे गज अज्ञात चोरट्याने कापले आणि आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ८८ हजारांची रोकडसह ३० हजारांच्या चांदीच्या वस्तू, २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एक लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक येसेकर तपास करीत आहेत.

तर, उपनगर हद्दीमध्ये चोरट्यांनी ज्वेलरी दुकान फोडून ४० हजारांचे दागिने चोरून नेले. वैष्णव सुनील काजळे (रा. देवळालीगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे बिटको पॉईंटवर जलधारा कॉम्प्लेक्समध्ये काजले ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या सोमवारी (ता. २६) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी जाळी उचकटून शटक उचकटले. चोरट्यांनी दुकानातून ४० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक भामरे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT