Crime esakal
नाशिक

Nashik Crime: शहरात घरफोड्यांचे सत्र; 4 घटनांमध्ये 7 लाखांचा ऐवज चोरीला

पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आणखी चार घरफोड्या झाल्या असून, सुमारे सव्वा सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलिसांनी हायप्रोफाईल घरफोडीची उकल केल्यानंतरही शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबलेले नाही. उलट, पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आणखी चार घरफोड्या झाल्या असून, सुमारे सव्वा सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

यात दोन घरफोड्या या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडल्या आहेत. यामुळे शहर पोलिसांसमोर घरफोड्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (Burglary session in city 7 lakhs stolen in 4 house burglaries Nashik Crime)

अशोका मार्ग परिसरातील कल्पतरु नगरमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने व रोकड असा ३ लाख २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

अरुण लक्ष्मण कपिले (रा. प्रल्हाद आर्केड, कल्पतरु नगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.५) भरदिवसा दुपारी दीडच्या सुमारास सदरची घरफोडी झाली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, इंदिरानगर परिसरामध्ये दोन घरफोड्या झाल्या आहेत. राजीव नगर परिसरातील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातून १ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली.

रमेश नारायण येवले (रा. स्नेहल बंगला, राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा बंगला ३० डिसेंबर ते ४ जानेवारी या दरम्यान बंद असताना अज्ञात चोरट्याने घरफोडी केली.

तर, इंदिरानगर परिसरातील आयटीआय कॉलनीसमोर असलेल्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुसरी घरफोडी केली.

मिलिंद प्रभाकर कुसमोडे (रा. विश्वास सोसायटी, आयटीआय कॉलनीसमोर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.५) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी करीत ७६ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

जुने सिडकोतील शिवाजीनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५० हजारांची रोकड चोरून नेत घरफोडी केली.

भूषण भगवान भामरे (रा. शनि मंदिरांमागे, शिवाजी चौक, जुने सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवार (ता.२) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सदरची घरफोडी केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला

सिन्नर फाटा परिसरातील महापालिकेच्या शाळेतील कार्यालयात लावलेले २४ हजार रुपयांचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.

संतोष बाबुराव वाळुंज (रा. पवन रेसीडेन्सी, रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या २३ ते २९ डिसेंबर या दरम्यान सदरची चोरीची घटना घडलीअ आहे.

घरफोडीची आकडेवारी

पोलीस ठाणे............घरफोडीची रक्कम

मुंबई नाका.............३,२३,६०० रु.

इंदिरानगर..............१,७२,००० रु.

इंदिरानगर...............७६,००० रु.

अंबड......................१,५०,००० रु.

नाशिकरोड (चोरी).....२४,००० रु.

एकूण :....................७,४५,६०० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT