The Pune-Lasalgaon bus landed in the ditch on the side of the road.  esakal
नाशिक

Nashik Accident News : स्टेअरिंग फेल झाल्याने बस थेट खड्ड्यात; पुणे-लासलगाव बसला अपघात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : स्टेअरिंग फेल झाल्याने पुणे ते लासलगाव ही धावती एसटी बस थेट महामार्गावरून बाजूच्या खड्ड्यात जाऊन मोठ्या दगडाला धडकली. बसमधील ७५ ते ८० प्रवासी बालंबाल बचावले, तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे हा अपघात झाला. बसचालक निवृत्ती रामभाऊ हांडगे हे पुणे ते लासलगाव ही बस (एमएच १४ बीटी ४११८) घेऊन लासलगावच्या दिशेने येत होते. (bus accident at Eklahare on Pune Nashik highway nashik accident news)

बसमध्ये ७५ ते ८० प्रवासी होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास बस एकलहरे गावाजवळ आली असता, चालक हांडगे यांना स्टेअरिंग फेल झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविले, तोपर्यंत बस महामार्गावरून बाजूच्या खड्ड्यात जाऊन मोठ्या दगडाला धडकली आणि थांबली. बसचालक हांडगेंच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ७५ ते ८० प्रवाशांचे प्राण वाचले. हांडगे व वाहक एस. एस. सानप यांनी बसमधील प्रवाशांना इतर बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना केले.

"लासलगाव आगाराला नवीन गाड्या मिळाव्यात, यासाठी मी आंदोलनाचा इशारा दिला होता. पुणे गाडीच्या स्टेअरिंग प्रॉब्लेममुळे अनेक प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे ते वाचले. परिवहन महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असेल तर अचानक आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. तत्काळ लक्ष घालून नवीन बस मिळविण्यासाठी प्रयत्न करावे." - जयदत्त होळकर सरपंच, लासलगाव

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"सुरवातीला लासलगाव बस आगारात ५६ बस होत्या, आता ३४ बस कार्यरत आहेत. नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. नवीन बस उपलब्ध झाल्यावर देण्यात येतील, असे वरिष्ठांनी कळविले आहे." -श्रीमती सविता काळे आगारप्रमुख, लासलगाव

"बस नाशिक-पुणे महामार्गावरून येत असताना स्टेअरिंगमध्ये प्रॉब्लेम वाटला, त्यामुळे बस उभी करण्यासाठी ब्रेक दाबला गेला. बसवर नियंत्रण ठेवून बस बाजूच्या खड्ड्यात गेली. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समाधान आहे. नंतर प्रवाशांना वाहकाच्या मदतीने दुसऱ्या बसने मार्गस्थ केले." -निवृत्ती हांडगे बसचालक, लासलगाव

"लासलगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवासी व चाकरमान्यांना नेहमीच बसतो. अनेक गाड्यांचा विमा संपलेला आहे. काही गाड्या रस्त्यावर चालण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. काही गाड्यांना रस्त्यात प्रवाशांकडून धक्का मारण्याची वेळ येते." -हर्शल कोचर नियमित प्रवासी-लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT