सिडको (नाशिक) : कोरोना संकटकालीन परिस्थितीमध्ये बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी जिवाची पर्वा न करता नागरिकांसाठी मदतीला धावून येत असल्याचे चित्र सध्या आहे. दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी कोरोनाच्या भीतीने फार्महाउसवर जाऊन बसल्याचे दिसून येत आहे. अशा नगरसेवकांना प्रभागातील नागरिक मदतीसाठी आर्त हाक मारताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (coronavirus) भीतीने फार्महाउसवर गेलेल्या नगरसेवकांना परिसरातील वैतागलेले नागरिक ‘नगरसेवकांनो, परत फिरा रे प्रभागाकडे आपुल्या’ अशा प्रकारची आर्त हाक मारताना दिसून येत आहे. (Call-out-to-corporators-who-wen-to- the-farmhouse-nashik-marathi-news)
फार्महाउसवर असलेल्या नगरसेवकांना आर्त हाक
कोरोना संकटकालीन परिस्थितीमध्ये आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात आठ हजार ३७१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर लाखोंच्या संख्येने रुग्ण बरेही झाले आहेत. असे असले तरी दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या कोरोना हाहाकारात असंख्य चांगली माणसेदेखील आपल्यातून निघून गेल्याची खंत आजही नागरिकांमधून ऐकायला मिळते. कोरोनाशी लढा देताना दोन विद्यमान नगरसेविका, पोलिस, शासकीय कर्मचारी व असंख्य सर्वसामान्य नागरिकांचा यात बळी गेला आहे. काही जण मृत्यूच्या दारातून परतदेखील आले आहेत. अशी भयावह परिस्थिती असतानादेखील काही लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस, शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार आदींनी जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणे पसंत केले आहे. त्यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यात त्यांची मदत झाली यात काही शंका नाही; परंतु दुसरी लाट जाऊनही तिसऱ्या लाटेच्या भीतीने काही नगरसेवक फार्महाउसवर गेल्याचे नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. मदतीने व्याकूळ झालेले नागरिक सध्या नगरसेवकांच्या शोधात असून, कोरोनाच्या भीतीने फार्महाउसवर असलेल्या नगरसेवकांना आर्त हाक मारताना दिसत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.