PM crop loan scheme painting esakal
नाशिक

Nashik: सुलेखनातून शेतकऱ्यांना पिक विमा नोंदणीचे आवाहन; चापडगाव ZP शाळेतील शिक्षक नाईकवाडी यांचा पुढाकार

अजित देसाई

Nashik News : प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे यासाठी महसूल आणि कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने तर राज्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा हिस्सा भरण्याचा भार हलका करण्यासाठी पुढाकार घेतला असून राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा योजनेची नोंदणी करता येणार आहे.

खरीप आणि रब्बी हंगामासाठी असणाऱ्या पिक विमा योजने त शेतकऱ्यांना सहभागासाठी आवाहन करण्यात येत आहे. यासाठी शासन पातळीवर मोठ्या प्रमाणात खर्च देखील करण्यात येत आहे.

मात्र, सरकारच्या या उपक्रमाची प्रसिद्धी व्हावी व अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेऊन नोंदणी करावी यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या सेवेतील कला शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. (Calls to farmers for crop insurance registration through calligraphy Initiative of teacher Naikwadi of Chapdgaon ZP School Nashik)

एकनाथ नाईकवाडी हे निफाड तालुक्यातील चापडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. चित्रकलेचा व्यासंग असलेल्या श्री. नाईकवाडी यांनी ग्राफिटीच्या माध्यमातून आपला कुंचला फिरवत शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर संदेश दिला आहे .

'आता भरा एक रुपया फक्त...

कोणतेही पीक कितीही क्षेत्र...' या आशयाचा हा संदेश असून एक रुपयाचे ठसठशीत नाणे देखील श्री. नाईकवाडी यांनी रेखाटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

'प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 खरीप हंगाम' या शीर्षकाखाली ही ग्राफिटी रेखाटन्यात आली आहे. संदेश अधिक उठावदार होण्यासाठी शेतात नांगरणी करणारा शेतकरी आणि बैल जोडी दाखवण्यात आल्याने श्री नाईकवाडी यांची कल्पकता शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

कलाशिक्षक असणारे श्री नाईकवाडी हे नाशिक जिल्ह्यात सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आणि प्रासंगिक घटनांवर ग्राफिटीच्या माध्यमातून ते नेहमीच संदेश देत असतात.

पिक विमा योजना संदर्भातील त्यांनी दिलेला संदेश व्हाट्सअप व इतर समाज माध्यमांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता झाला. आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजनेची बिन पैशांची जाहिरात देखील झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT