A car caught fire at Mohdari Ghat. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : मोहदरी घाटामध्ये कारने घेतला पेट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : येथे उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. ही घटना नाशिक -पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या पायथ्याशी घडली.

सिन्नर मोहदरी घाटाच्या पायथ्याशी कार उभी करून पेट्रोल आणण्यासाठी गेलेला कारचालक परत येईपर्यंत कार जळून खाक झाली होती. रविवारी (ता.११) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (Car caught fire in Mohdari Ghat Nashik Fire Accident)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शुभम विलास चिटे (२५, रा. शिवशक्ती हौसिंग सोसायटी, चंद्रेश्वरनगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड, नाशिक रोड) यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. श्री. चिटे हे टाटा टियागो कारने (एमएच. १५/ एचजी २२९७) बहिणीला घेण्यासाठी पुणे येथे गेलेले होते.

तेथून परतत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याला हॉटेल कृष्णासमोर त्यांची कार बंद पडली. पेट्रोल संपले असावे असे समजून शुभमने बहिणीला नातेवाईकांसोबत घरी पाठवले. त्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी तो पेट्रोलपंपाकडे गेला.

पेट्रोल घेऊन परतला असता त्याला कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली दिसली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र कार जळून खाक झाली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT