मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे शिवारात कारला पाठीमागून भरधाव आलेल्या कन्टेनरने ओव्हेरटेक (Overtake) करण्याच्या नादात धडक दिल्याने कार उलटली. या अपघातात (Accident) कारमधील तिघे जण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी (ता.२०) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
जबर धडकेने कार खाल्ल्या 2- 3 पल्टी
नाशिकहून मालेगावकडे येणाऱ्या इको कारला (MH - 41 BE - 3707) पाठीमागून भरधाव आलेल्या कन्टेनरने (MH - 04 - JU- 9160) ओव्हरटेक करताना जबर धडक दिली. कन्टेनरची धडक इतकी जबरदस्त होती की कार दोन-तीन पल्टी खाऊन काही अंतरावर उलटली. या अपघातात इम्रान करीम शेख (39, रा. सादीकनगर, वडाळा, नाशिक), गुलाब शामसिंग सोनवणे (वय 69, रा. हेंद्रुण, धुळे) या दोघांसह तिघे जण जागीच ठार झाले. तिसऱ्या मृताची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नव्हती. अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातात ठार झालेल्या तिसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या खिशात सापुतारा ते नाशिक या गुजरात बसचे तिकीट मिळून आले आहे. त्या संदर्भात कोणाला ओळख पटल्यास तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. सामाजिक कार्यकर्ते व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य शफीक अहमद व सहकाऱ्यांनी मृतदेह व जखमींना रुग्णालयात आणण्यासाठी सहकार्य केले. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कन्टेनरचालकाला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.