A car stuck in a drain at Navin Mela bus stand due to a broken roof esakal
नाशिक

Nashik Accident News: ढापा तोडून कार खड्ड्यात...; नवीन मेळा बसस्थानकातील घटना

मंगळवारी (ता. १३) भरधाव वेगातील कार बसस्थानकातील ढाप्यावरून गेली असता, ढापा तुटून कार खोला नाल्याच्या खड्ड्यात गेली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चार दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षेतील नवीन मेळा बसस्थानकाचे उद्‌घाटन झाले आणि मंगळवारी (ता. १३) भरधाव वेगातील कार बसस्थानकातील ढाप्यावरून गेली असता, ढापा तुटून कार खोला नाल्याच्या खड्ड्यात गेली.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु येथील कामाच्या दर्जेबददल मात्र चर्चेला उधान आले. (car fell into pit after breaking New Mela Bus Stand incident Nashik Accident News)

शरणपूर रोडवरील नवीन मेळा बसस्थानकाचे गेल्या शनिवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून हे बसस्थानक उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत होते.

दरम्यान, मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास चारचाकी कार (एमएच ०४ एआर ८८) बसस्थानकाच्या आवारातून भरधाव वेगात शरणपूर रोडच्या दिशेने निघाली. मात्र अद्याप बसस्‌थानकाचे शरणपूर रोडवरील प्रवेशद्वार बंद आहे.

या दिशेने वाहने जाऊ नयेत म्हणून सिमेंट पाईप टाकून रस्ता अडविण्यात आलेला आहे. तसेच, सुरक्षारक्षकही आहे. भरधाव वेगातील कार त्या दिशेने जात असताना सुरक्षारक्षकाने त्यास रोखण्याचा इशाराही केला.

परंतु चालकाने त्याच वेगात कार नेली असता, जेव्हा चालकाला समोर रस्ता सिमेंट पाईपने अडविलेला पाहताच रस्त्याच्या कडेच्या कथड्याकडे कार नेली.

या कथड्यालगतच बसस्थानकाच्या आवारातील पाणी वाहून जाण्यासाठी नाला केला असून त्यावर ढापे टाकण्यात आलेेले आहेत. त्या ढाप्यावर जाऊन कार थांबली असता, पुढील चाकाखालील ढापेच तुटले आणि कार खड्ड्यात अडकली.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे ढाप्यांच्या दर्जांची चर्चा मात्र बसस्थानकात रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

SCROLL FOR NEXT