fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : रोख रक्कम अपहार प्रकरणी आयुक्तांकडे चौकशीची शिफारस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या पूर्व विभाग, नाशिक रोडसह मुख्यालयात मालमत्ता कराच्या रकमेचा अपहार झाल्या प्रकरणे तीन कर्मचाऱ्यांची विभागस्तरीय चौकशीची शिफारस महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. (case of embezzlement of cash nmc Commissioner recommended to be investigated Nashik fraud crime News)

नागरिकांना मालमत्ता कर व घरपट्टी भरण्यासाठी सहा विभागात कार्यालय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिक कर भरतात. सुविधा केंद्रामधील संगणक सॉफ्टवेअरचे पासवर्ड विभागीय अधिकाऱ्यांकडे आहेत.

नागरिकांनी कर दिल्यानंतर त्यांना पावती दिली जाते. पावतीनुसार महापालिकेच्या ट्रेझरीमध्ये रोख रकमेचा भरणा केला जातो. परंतु रोख रक्कम भरताना पावत्या रद्द झाल्याचे दाखविले जात. यातून गांधीनगर येथील भरणा केंद्रात २२ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली होती.

यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबरोबरच नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पूर्व विभागातदेखील २१ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

संबंधित कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे रकमेचा भरणा केला, तसेच महापालिका मुख्यालयातील लेखा विभागात एका महिला कर्मचाऱ्याने २०१३ ते २०१६ या कालावधीत जवळपास पाच लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली.

त्या महिला कर्मचाऱ्याकडूनदेखील वसुली करण्यात आली. या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, असा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला. मात्र अद्यापही त्यावर कारवाई होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT