Shasan Aplya Dari  esakal
नाशिक

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री जा घरी’... फलक लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Shasan Aplya Dari : ‘ शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री जा घरी, या आशयाचा फलक लावणाऱ्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महापालिका पश्चिम विभागीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. राज्य सरकारतर्फे शनिवार (ता. १५) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (case registered against person who put up signboard with content to cm leave city shasan aplya dari nashik news)

त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य असे सुमारे आठ मंत्री कार्यक्रमास उपस्थित होते.

यानिमित्ताने मंत्र्यांचे विविध मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आरपीआय एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आदेश पगारे यांच्याकडून त्र्यंबक सिग्नल येथे ‘ शासन आपल्या दारी मुख्यमंत्री जा घरी’, आशयाचा फलक लावला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ओझर विमानतळास जिल्ह्याचे भूमिपुत्र पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री टाळाटाळ करत आहे. दलितांवर होणारे अन्याय अत्याचाराची दखल मुख्यमंत्री आणि शासन घेत नाही. असा मजकूरही फलकावर लिहला होता.

पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी चौकशी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. फलक लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत आढळले.

बेकायदेशीररीत्या फलक लावल्याप्रकरणी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून फलक काढून घेण्यात आला. आदेश पगारे यांच्याविरुद्ध विभागाचे लिपिक वैभव हिरे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT