नाशिक : सातपूर पोलिस चौकीजवळ गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या तीनचाकी रिक्षाचे चाक पंक्चर झाले असता, भरलेल्या सिलेंडरचा जॅकसारखा वापर रिक्षाचालकाने केला. भररस्त्यामध्ये यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने या प्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
तसेच, सदरची रिक्षा जप्त करण्यात आली असून, वाहनाचे कागदपत्रांसह गॅस वितरकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. दरम्यान, सदरील रिक्षाची अवस्था पाहता गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी केला जात असल्याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे. (case registered against rickshaw driver who dangerously handle gas cylinders Nashik Crime News)
मंगळवारी (ता. २७) दुपारी सातपूर पोलिस चौकीजवळ त्र्यंबकरोडवर गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी तीनचाकी रिक्षाचे मागील टायर पंक्चर झाले होते. यावेळी रिक्षाचालकाने रिक्षातील भरलेले गॅस सिलिंडरचा वापर जॅकसारखा केला. भररस्त्यात सदरचा प्रकार करणे अधिक धोकादायक होते. रिक्षाच्या वजनाने सिलिंडरमधून गॅस लिक होऊन मोठी दुर्घटना घडू शकली असती. सदरची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले.
तत्काळ सदरची रिक्षा पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आली. रिक्षाचालक विकी शरद साळवे (२५, रा. भीमवाडी, भद्रकाली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, सदरील रिक्षाला नंबरप्लेट नव्हती. रिक्षा अत्यंत दुरवस्थेतील आहे. तरीही या रिक्षाचा वापर घरगुती गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी केला जात होता. या बाबत पोलिसांनी संशयित रिक्षाचालकाकडून वाहनाची कागदपत्रांची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे, रिक्षातील सिलिंडर हे गोकूळ गॅस एजन्सीचे असल्याने सदरील एजन्सीकडूनही याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. या तपासातूनच वाहनाची माहिती व गॅस एजन्सीकडे वापरात असलेल्या वाहनांची माहिती मिळू शकणार आहे. हवालदार पाटील हे तपास करीत आहेत.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष
शहरात शेकडो गॅस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून धावतात. परंतु या वाहनांच्या तांत्रिक फिटनेसची तपासणी वेळच्या वेळी होते की नाही याबाबतची कोणतीही शहनिशा केली जात नसल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी वाहतूक पोलिस शाखेसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने वेळोवेळी करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.
"सदरची रिक्षा जप्त करण्यात आली असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर काही माहिती मिळू शकेल. तपासातून गॅस एजन्सीचीही माहिती घेतली जाईल."- महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.