Nashik News : रस्ते, वाड्या, वस्त्यांना दिलेली जातिवाचक नावे हद्दपार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने नाशिक विभागातील तीन हजार ९२ नावांपैकी दोन हजार ९२९ नावांत बदल झाला आहे. त्यांना नव्याने नावे देण्यात आली आहेत. (Caste names given to 3 thousand roads settlements were changed nashik news)
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी (ता.२९) विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक घेतली. समाज कल्याण विभागाने जातिवाचक नावे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात ३०९२ जातिवाचक नावांपैकी २९२९ जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील २ हजार ४९० जातिवाचक नावे बदलण्यात आली. ग्रामीण भागात शंभर टक्के काम झाल्याबद्दल विभागीय आयुक्त गमे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ तांबे, सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, तहसीलदार पल्लवी जगताप उपस्थित होते.
तृतीयपंथीयांना हक्काचा निवारा मिळणार
विभागीय स्तरावरील तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. तृतीयपंथीयांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करून प्रस्ताव तयार करावा. अतिक्रमणाच्या ठिकाणी जर निवास करत असतील तर ती जागा नियमानूकल करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही गमे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.